माधुरी कानेटकर बनल्या तिसर्‍या महिला लेफ्टिनंट जनरल, ‘ही’ असणार जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लष्करात महिलांना कमांड पोस्टींग देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर 29 फेब्रुवारीला मेजर जनरल माधुरी कानेटकर यांना लेफ्टनन्ट जनरलच्या रँकसाठी प्रमोशन देण्यात आले आहे. माधुरी कानेटकर लेफ्टनन्ट जनरल बनणार्‍या इंडियन आर्म्ड फोर्सच्या तिसर्‍या महिला अधिकारी आहेत. त्यांना आता लष्कराच्या मुख्यालयात, इन्टीग्रेटेड डिफेन्स स्टाफमध्ये तैनात करण्यात आले आहे, जे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अंतर्गत येते.

माधुरी कानेटकर आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणेच्या माजी डीन आहेत. मेजर जनरल माधुरी कानेटकर आणि त्यांचे पती लेफ्टनन्ट जनरल राजीव, पहिले दाम्पत्य आहे, ज्यांनी सशस्त्रमध्ये ही रँक मिळवली आहे. सर्जन आणि व्हाईस अ‍ॅडमिरल आणि भारतीय नौदलाच्या माजी थ्री स्टार फ्लॅग ऑफिसर डॉ. पुनिता अरोड़ा पहिल्या अधिकारी होत्या, ज्यांची लेफ्टनन्ट जनरल पदावर नियुक्ती करण्यात आली होती. हवाई दलाच्या महिला एयर मार्शल पद्मावती बंदोपाध्याय या पदावर बढती मिळणार्‍या दुसर्‍या महिला होत्या.

मेजर जनरल माधुरी कानेटकर चीफ ऑफ डिफन्स स्टाफच्या अंतर्गत तैनात होतील, ज्यांची मुख्य जबाबदारी संयुक्त योजना आणि एकीकरणच्या माध्यमातून सेवांची खरेदी, प्रशिक्षण आणि संचालनात अधिक ताळमेळासाठी अर्थसंकल्पातील तरतुदीचा योग्य उपयोग करणे ही आहे.