‘या’ नव्या फोटोशूटमुळं अभिनेत्री मलायका पुन्हा एकदा चर्चेत (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरानं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या हॉटनेससाठी फेमस असणाऱ्या मलायकाचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये मलायका खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. मलायकाचं हे नवीन फोटोशुट दिसत आहे. मलायकानं नेहमीप्रमाणे हॉटनेसचा तडका दिला आहे.

समोर आलेल्या नवीन फोटोंमध्ये दिसत आहे की, मलायकानं सिल्व्हर कलरचा ड्रेस घातला आहे. जो खूपच शॉर्ट आहे ज्यामध्ये मलायका सेक्सी दिसत आहे. नेहमीप्रमाणं मलायकानं बोल्ड पोज दिल्या आहेत.

मलायका आपल्या बोल्ड आणि बिंधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. मलायकाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती तिच्याहून 11 वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिनं अनेक आयटम साँग केले आहेत. लवकरच मलायका इंडियाज बेस्ट डान्सर हा डान्स शो जज करताना दिसणार आहे. मलायकानं याआधी इंडियाज गॉट टॅलेंट, नच बलिए, जरा नचके दिखा, झलक दिखला जा अशा अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये जजिंगचं काम केलं आहे.

फेसबुक पेज ला लाईक करा 👉: https://www.facebook.com/policenama/

Loading...
You might also like