‘आयटम म्हणणाऱ्याचं थोबाड फोडेन’ : मलायका अरोरा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या फिटनेस आणि लुकसाठी अभिनेत्री मलायका अरोरा प्रसिद्ध आहेच. परंतु मलायकाने अनेक आयटम साँगमधून आपल्या डान्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री व्यतिरीक्त डान्सर म्हणूनही तिला ओळखले जाते. चल छय्या छय्या पासून ते मुन्नी बदनाम पर्यंत अनेक तिची गाणी गाजलेली आहेत. या गाण्यांना तसं तर आयटम साँग म्हटलं जातं. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का, मलायका जरी आयटम साँग करत असली तरी आयटम या शब्दावरच मलायकाला आक्षेप आहे.

एका मुलाखतीत बोलताना खुद्द मलायकानेच याबाबत खुलासा केला आहे. मलायका म्हणाली की, “मला अभिनय आधीपासूनच आवडत नाही. मला डान्स सर्वात जास्त आवडतो. मी कोणत्याही गाण्यावर माझ्या मर्जीने नाचते. आतापर्यंत कोणीच मला जबरदस्ती नाही केली. गाणे निवडतानाही मी खूप विचारपूर्वक करते. जर या सगळ्यात मला काही आक्षेपार्ह वाटलं तर मी त्याबद्दल बोलते. माझी मतं मी व्यक्त करते.” असे मलायकाने स्पष्ट केले.

यावेळी बोलताना मलायकाला आयटम या शब्दाचा राग असल्याचंही तिनं सांगितलं. मलायका म्हणाली की, “मला आयटम शब्द कधीच आवडला नाही. जर एखादी मला ‘काय आयटम आहे ही’ असं म्हटलं तर मी त्याचं थोबाड फोडेल.” असं मलायका म्हणाली.

अर्जुन कपूरच्या अफेअरला घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून मलायका चर्चेत आहे. लवकरच हे दोघे लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु याबाबत दोघांनी अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

View this post on Instagram

Au revoir @niyamamaldives #iloveumaldives♥️

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

You might also like