43 व्या वर्षीही ‘मल्लिका’सारखं ‘यंग’ दिसायचंय तर आजच करा ‘हे’ काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार मल्लिका शेरावत सध्या सिनेमांपासून दूर आहे. अस असलं तरी आपल्या हॉट फिगर आणि बोल्ड फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. 43 वर्षीय मल्लिका आजही खूप फिट आणि यंग दिसते. नुकतंच तिनं यामागील गुपित सांगितलं आहे. मल्लिका काही दिवसांपासून अंयग्गार योगा करत आहे. तिनं अनेकदा याचे फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर केले आहेत.

अंयग्गार योगाबद्दल बोलताना मल्लिका म्हणाली, “गेल्या 6 वर्षांपासून मी अंयग्गार योगा करत आहे. हा योगा बॉडी अलाईनमेंटवर आधारीत असल्यानं यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगलं रहातं. म्हणूनच हा योगा मला खूप आवडतो. हा योगा एक प्रकारे ध्यानासारखा आहे ज्यामुळे तणावापासून मुक्ती मिळते. शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते. हेच हा योगा करण्याचं खास कारण आहे. यानंतर हा योगा आवडण्याचं कारण म्हणजे शारीरिक लाभ आहे.”

अयंग्गार योगाचे फायदे सांगताना मल्लिका म्हणाली, “या योगामुळे खाण्याच्या तीव्र इच्छेवर लगाम लावण्यास मदत होते. मला गोड खूप आवडतं. मी जेव्हापासून अंयग्गार योग करत आहेत तेव्हा पासून माझी गोड खाण्याची इच्छाही कंट्रोल होते. जेव्हा जेव्हा मी योगा करते तेव्हा मला चांगली झोपही लागते. दैनंदिन जीवानातील अनेक लहान सहान गोष्टींत मला मदत होते.”

आपल्या आहाराबद्दल बोलताना मल्लिका म्हणाली, “मी नेहमीच शाकाहारी होती. गेल्या 10 वर्षांपासून मी वेगन(प्राण्यांपासून मिळणाऱ्या कोणत्याही खाद्यपदार्थाचं सेवन न करणं) आहे. मी दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांचंही सेवन करत नाही. माझं खाण पिणं खूप साधं आहे. मी जास्त करून घरचं जेवणच खाते. सध्या खाद्यपदार्थांचा दर्जाही खालावला आहे. आपण जे काही खातो ते खाताना काळजी घेणं गरजेचं आहे.” असंही तिनं सांगितलं.

मल्लिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. एकता कपूरची वेब सीरीज सबकी फटेगी मध्ये मल्लिका शेवटची दिसली होती. या सीरीजमधून मल्लिकानं तिचा डिजिटल डेब्यू केला होता. या सीरिमध्ये तिच्यासोबत तुषार कपूर, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, शेफाली जरीवाला, साक्षी प्रधान, श्वेता गुलाटी, अनिल चरणजीत आणि संजय मिश्रा यांसारखे स्टार होते. काही दिवसांपूर्वीच ती बिग बॉसमध्ये आली होती. सलमान सोबत तिनं खूप मस्ती केली.

https://www.instagram.com/p/B64rpxrJ2i-/

https://youtu.be/qUD6PBqaasA