शहराच्या मध्यवस्तीतून दुचाकी लंपास करणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहराच्या मध्यवस्तीतून दुचाकी लंपास करणाऱ्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

गणेश राजू वाघिरे (वय १९,रा. महात्मा गांधी वसाहत, कामगार पुतळा, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या मध्यभागातून वाघिरे याने दुचाकी लंपास केल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर त्याला शहराच्या मध्यभागात अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याच्याकडून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आल्या.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जाधव, बाबा दांगडे, संजय बनसोडे, प्रशांत शिंदे, आढारी आदींनी ही कारवाई केली.