नालासोपार्यात TikTok वरुन प्रेयसीची बदनामी
पोलिसनामा ऑनलाईन – प्रेयसीची आक्षेपार्ह व्हिडिओच्या आधारे सोशल मीडियावर बदनामी करण्याचे एक प्रकरण नालासोपारा येथे घडले आहे. आरोपी तरुणाने टिकटॉकवर महिलेच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्या. त्याशिवाय बनावट फेसबुक खाते बनवून त्यावरही फोटो प्रसारित केले होते.
पीडित महिला 30 वर्षांची असून ती नालासोपारा पश्चिम येथे राहते. तिचे याच परिसरात राहणार्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. किरकोळ वादातून आरोपीने तरुणीची सोशल मीडियावर बदनामी करण्यास सुरुवात केली. त्याने तरुणीचे खासगी छायाचित्रांची चित्रफीत तयार करून ती ‘टिकटॉकवर प्रसारित केली. बनावट फेसबुक खाते उघडून त्यावरही दोघांचे आक्षेपार्ह छायाचित्रे पोस्ट केली. ही सर्व छायाचित्रे आणि चित्रफिती त्याने पीडित महिलेच्या कुटुंबीयांना पाठवून तिची बदनामी केली. व्हॉट्सअॅपवरही आरोपीने बदनामी केली. याबाबत पीडितेने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.