राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ईव्हीएम मशीनचे दहन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे  मनुस्मृती व ईव्हीएम मशीनचे पक्षातर्फे दहन करण्यात आले. ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ चा कार्यक्रमाचा मराठवाड्यातील  विभागीय मेळावा औरंगाबाद मधील  संत तुकाराम नाट्यगृह सिडको येथे पार पडला. मेळाव्यानंतर नाट्यगृहाबाहेर मनुस्मृती व ईव्हीएम मशीनचे पक्षातर्फे दहन करण्यात आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7ea07ff0-cbca-11e8-b6b9-33b75f7107cb’]

ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करून भाजप निवडणुका जिंकत आहे. याला निवडणूक आयोगही जबाबदारही आहे, असा आरोप  यावेळी करण्यात आला. निवडणूक आयोग आणि भाजप सरकारच्या विरुद्ध घोषणाबाजी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या  कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन केले.

[amazon_link asins=’B06WD4JFDP,B06WP5SXNM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8c080c83-cbca-11e8-b054-cf567c69f53f’]

 राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांच्या नेतृत्वात मनुस्मृती व ईव्हीएम मशीनचे दहन आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवती आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, यांच्यासह मराठवाड्यातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘संविधान बचाओ, देश बचाओ. ईव्हीएम हटाव देश बचाओ’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.मेळाव्यानंतर अजित पवार यांच्या हस्ते विविध विष्‍णूनगर वार्डातील विविध विकास कामांचे लोकार्पणही करण्यात येणार आले.

इंदापूर : शाळकरी मुलीला अडवून बलात्कार करण्याची धमकी

गेल्या काही वर्षामध्ये देशात झालेल्या विविध घटनांमुळे आपले मुलभूत संवैधानिक अधिकार धोक्यात आले असल्याची भावना नागरिकांमध्ये झाली आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला आघाडीने देशभरात संविधान बचाओ, देश बचाओ ही मोहीम हाती घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद शहरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .