Maratha Kranti Morcha | फेसबुक लाईव्हवर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरेंचा आत्महत्येचा प्रयत्न, म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांना समितीवर घेण्यास विरोध केल्याने…’  (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maratha Kranti Morcha | व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे सोशल मीडियावर होणारी बदनामी सहन न झाल्याने मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) समन्वयक रमेश केरे (Coordinator Ramesh Kere) यांनी फेसबुक लाईव्हवर (Facebook Live) आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide) केला. यामुळे मराठा समाजासह सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. केरे यांनी विष प्राषन केल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील जेजे रुग्णालयात (JJ Hospital) दाखल करण्यात आले. विष प्राषन करण्यापूर्वी त्यांनी सविस्तर माहिती दिली. सोशल मीडियावर बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

विषप्राशन करण्यापूर्वी फेसबुक लाईव्हमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) समन्वयक रमेश केरे यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांमध्ये माझ्यावर चुकीचे आरोप झाले. त्यामुळे माझी नाहक बदनामी (Defamation) केली. मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्याविरोधात काम सुरू आहे. हे माझे शेवटचे फेसबुक लाईव्ह आहे. मागील काही दिवसांपासून ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip viral) होत आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उपसमितीच्या अध्यक्षपदी घेतले, मी त्यांच्या नावाला विरोध केला होता. त्यांच्याजवळच्या माणसांनी मला त्रास दिला, जाणीवपूर्वक मला बदनाम केले. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे.

 

 

रमेश केरे म्हणाले, मी आजवर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) मिळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आलो आहे, पण सोशल मीडियावर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सगळ्यांची चौकशी करा, सगळ्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे. ज्या लोकांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली असेल, त्याची सीबीआय (CBI), सीआयडीच्या (CID)माध्यमातून चौकशी केली पाहिजे. आशा, अक्षर, गौरी मला माफ करा, असे म्हणत केरे यांनी विष प्राशन केले. यानंतर त्यांना कुटुंबियांनी रूग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

सोशल मीडियावर मागील काही दिवसापूर्वी मोबाईलवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली
असून यामध्ये भाजपाच्या (BJP) दोन मोठ्या नेत्यांसह मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांचा उल्लेख आहे.
यामध्ये देवाण-घेवाणीचे उघड-उघड उल्लेख आहे. शिवाय आंदोलन दडपण्यासाठी राजकीय नेत्यांकडे कशा व कोणी-काणी फेर्‍या मारल्या याचाही उल्लेख आहे.
त्यामध्ये मराठा समन्वयक रमेश केरे यांचाही उल्लेख होता. मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी आर्थिक व्यवहार झाले आणि आंदोलन संपवण्यासाठी प्रयत्न झाला,
अशाप्रकारचे संभाषण त्यात आहे. त्यावर रमेश केरे यांनी कोणतेही कृत्य केले नसल्याचे सांगितले, पण त्यांच्यावरील आरोप सुरूच राहिले.

 

Web Title :- Maratha Kranti Morcha | ramesh kere patil marath kranti morcha maratha kranti morcha coordinator ramesh kerens suicide attempt on facebook live