मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर, ताकदीनं बाजू मांडणार : शरद पवार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार शरद पवार हे शुक्रवारी कोल्हापूर येथे होते. त्यावेळी शरद पवार यांनी तेथे माध्यमाशी सवांद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मराठा आरक्षणप्रश्नी २५ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्याने मी कांही यावर आता बोलण्यास इच्छित नाही. परंतू दक्षिणेतील राज्यांनी ६० टक्के आरक्षण देवूनही तिथे कोणतीच स्थगिती नाही. परंतु महाराष्ट्र राज्याला मात्र वेगळा अनुभव येत आहे. राज्य सरकार या विषयांत गंभीर आहे. त्यामुळे सरकारच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ याप्रकरणी न्यायालयात ताकदीने बाजू मांडतील अशी व्यवस्था केली आहे. असे पवार म्हणाले.

पुढे शरद पवार यांनी साखर कारखान्याबद्दल हि भाष्य केले आहेत. केंद्र सरकारने साखरेचा खरेदी दर वाढवावा यासाठी विविध राज्यांतील साखर उद्योगांशी संबंधित लोकांचे शिष्टमंडळ राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली पुढील आठवड्यात केंद्र सरकारला भेटणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यावेळी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच केंद्र सरकारने ऊसाची एफआरपी निश्चित केली आहे.

मध्यंतरी इथेनॉलचा दरही चांगला वाढवून दिला. परंतू साखरेची किंमत मात्र वाढवलेली नाही. सध्या साखरेचा केंद्रानेच निश्चित करून दिलेला किलोचा दर ३१ रुपये आहे. राज्य साखर संघाने तो किमान ३८ रुपये करावा अशी मागणी यापूर्वीच केली आहे. साखरेचा खरेदी दर वाढवून मिळावा असाच आमचा प्रयत्न आहे अन्यथा कारखान्यांच्या अडचणी वाढतील व शेतकऱ्यांना ऊसाची बिले मिळणार नाहीत. तर कृषी कायदेबाबत आंदोलनाला शेतकऱ्यांना महाराष्ट्रातूनही एकत्रितपणे पाठिंबा द्यायचा विचार आहे असे शरद पवार यांनी सांगितले.