Maratha Reservation | रात्रीस खेळ चाले! सरकारच्या शिष्टमंडळाची मध्यरात्री जरांगेंशी चर्चा, वाचा सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेले मनोज जरांगे (Manoj Jarange Patil ) यांच्या भेटीसाठी काल मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री जालन्यात जाणार होते. मात्र मुख्यमंत्री जालन्याकडे फिरकले नाहीत. त्यातच पत्रकार परिषदेत माईक सुरूच राहिल्याने मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्याचे आपसातील बोलणे वायरल झाल्याने मोठा गोंधळ सुरू होता. अखेर सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे मध्यरात्री भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) उपस्थित होते. (Maratha Reservation)

बंद दाराआड चर्चा करणार नाही, असे म्हणत असताना अखेर राज्य सरकारने मनोज जरांगे यांना मध्यरात्री बंद दाराआड चर्चा करण्यास भाग पाडले. मध्यरात्री झालेली ही चर्चा सुमारे ४० मिनीटे सुरू होती.

या चर्चेनंतर जरांगे म्हणाले, चर्चा सकारात्मक झाली आहे. सकाळी मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्यावर समाधानी आहे की नाही हे कळेल. आज दिवसभर त्यांची वाट पाहू, असे जरांगे म्हणाले.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, जरांगे यांच्या टीमसोबत समाधानकारक चर्चा झाली. सरकार आरक्षणाबाबत (Maratha Reservation) गंभीर आहे. आजच्या चर्चेनंतर जे मुद्दे समोर आले त्या मुद्द्यांवर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा कालचा जालना जिल्हा दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव जालन्यात जाऊ नये असे पत्र आल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती
सूत्रांनी दिली. दरम्यान, काल जरांगे यांनी म्हटले होते की, उपोषण सोडा म्हणतात पण सोडवायला कुणीही येत नाही.
हे आरक्षणाप्रमाणेच झाले, देतो म्हणतात पण देत नाहीत. आज जरांगे यांच्या उपोषणाचा १७ दिवस आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडून लाच घेताना राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, महिला अभियंता, लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Elections | 48 मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Pune News | आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिकन जनशक्तीची मागणी

Modi Govt On Ujjwala Yojana | एलपीजी गॅस संदर्भात खुशखबर! केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतून 75 लाख मोफत गॅस कनेक्शन