‘धन मराठी, धून मराठी, धन्य मराठी….

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरातील मराठी माणसांकडून २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी कवी वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक मराठी अकादमीने याकरिता पुढाकार घेतला. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मराठी बोलली, लिहली, वाचली ,ऐकली आणि वाढली पाहिजे.

“माझी मराठीची बोलू कवतिके
परी अमृतातें ही पैजेसी जींके
ऐसी अक्षरें चि रसिके मेळवीन”

मराठी भाषेचा गौरव करताना संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला अमृताची उपमा देताना या ओवीचा वापर केला आहे . अमृत म्हणजे कधीही न मरणारा मराठी भाषा ही प्रत्येक अ- मृत म्हणजेच जिवंत प्राण्याला सहज समजेल प्रत्येक मानवाला मराठी भाषेची गोडी वाटेल अशी भाषा आहे .

‘एक परिच्छेद विकिपिडियावर’

यंदाचा मराठी भाषा दिन खूप खास असणार आहे कारण या वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे गेट वे ऑफ इंडियावरील भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होणार आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार ‘धन मराठी, धून मराठी, धन्य मराठी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच यानिमित्ताने आणखी एक मोहिम हाती घेण्यात येणार आहे, ती म्हणजे ‘एक परिच्छेद विकिपिडियावर’. यात मराठी भाषा गौरव दिनी, जगभरातील मराठी भाषकांनी मराठी देवनागरी लिपीतील किमान १ परिच्छेद मजकूर ‘मराठी विकिपीडियावर’ टाईप करावयाचा आहे. याच माध्यमातून पुढाकार घेऊन आपण वाढवण्याच्या प्रयत्न करूया.