पुण्यात छळाला कंटाळून विवाहीतेची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   मद्यापी पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चांदणी अमोल मोहिते (वय ३०,रा. गणेश पेठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अमोल आणि दोन नातेवाईकांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चांदणी यांची बहीण सपना चव्हाण (वय ३४,रा. २५, नाना पेठ) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोलला दारूचे व्यसन आहे. तो जुगार खेळतो. गेल्या काही दिवसांपासून अमोल आणि त्याच्या नातेवाईकांनी चांदणीला स्वयंपाक नीट करत नाही, असे टोमणे मारण्यास सुरूवात केली होती. महिन्याभराचे दूधबील तसेच वीजबील न भरल्याने तिला बोलण्यात आले. पतीने मद्याासाठी पैसे मागितल्याने चांदणी नैराश्यात होती. तिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर चांदणीच्या बहिणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत चांदणीचा छळ होत असल्याने तिने आत्महत्या केल्याचे म्हटले. अधिक तपास उपनिरीक्षक अभिजीत पाटील करत आहेत.