राशी परिवर्तन : 22 मार्चपर्यंत ‘धनु’ राशीमध्ये मंगळ, 5 राशींसाठी ‘शुभ’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : फल ज्योतिषात मंगळाचे राशी परिवर्तन खुप महत्वपूर्ण मानले जाते. मंगळ ग्रहाला ज्योतिषमध्ये सर्व 12 ग्रहांच्या सेनापतीचा दर्जा आहे. मंगळाने 8 फेब्रुवारी 2020ला राशी बदलली आहे. वृश्चिकमधून धनु राशित प्रवेश केला आहे. येथे मंगळ आता 22 मार्च पर्यंत राहील. मंगळाने रास बदलल्याने 5 राशिच्या जातकांना याचे शुभ परिणाम प्राप्त होतील.

मेष
मंगळाचे राशी परिवर्तन मेष राशिच्या जातकांसाठी शुभ फळ देणारे आहे. सुरू असलेल्या समस्या आता संपतील. कामात व्यापारात प्रगती होईल. तुम्ही केलेले कार्य आणि निर्णयांचे कौतूक होईल. नोकरीत पदोन्नतीची मानसन्मान प्राप्तीचे योग आहेत.

कर्क
कर्क राशिच्या जातकांना लोकांवर मंगळाच्या स्थितीमधील बदलांचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. कामात यश मिळण्याचे योग आहेत. परदेश प्रवास किंवा परदेशी नागरिकत्वासाठी अर्ज करणे लाभदायक ठरेल.

सिंह
परिवर्तन शुभ राहिल. अडकलेली कामे वेग घेतील. मान-सन्मानात वाढ आणि नोकरीत सुख मिळेल. उत्पन्नाचे अन्य मार्ग सापडतील आणि दिलेले पैसे परत मिळतील. प्रशासकीय नोकरीसाठी अर्ज करणे लाभदायक ठरू शकते. वरिष्ठांशी चांगले संबंध बनतील.

तुळ
तुळ राशिच्या लोकांना मंगळाचे परिवर्तन प्रगती आणि धनलाभाचे संकेत देत आहे. मंगलकार्यात सहभागी व्हाल आणि यश प्राप्त कराल.

कुंभ
धनसंबंधी कामात फायदा होऊ शकतो. कुटुंबात सुख कायम राहिल. या राशितील लाभभावात मंगळ गोचर तुमच्यासाठी कोणत्याही वरदानपेक्षा कमी नाही. लाभाचा मार्ग प्रशस्त होईल. रोजगारासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील.