क्रिकेटमधील ‘सुपरमॅन’, हवेत उडी घेऊन घेतला अजब ‘कॅच’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यात फक्त फलंदाज आणि गोलंदाज नाही तर संघातील सर्व खेळाडूंची कामगिरी ही विचारात घेतली जाते. त्यामुळे एका कॅचमुळे सामना जिंकला जाऊ शकतो. त्यामुळेच तर कॅच विन द मॅच असे म्हटले जाते. क्रिकेट म्हटले कि अनेक रोमांचकारी सामने डोळ्यासमोर उभे राहतात आणि त्या सामन्यांमधील घेतलेल्या कॅच या अविस्मरणीय ठरतात. असाच अविस्मरणीय कॅच सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या मार्श कपमध्ये घेण्यात आला.

मार्श कपमध्ये झालेल्या विक्टोरिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात कॅमरन वॅलेंटीनं (Cameron Valente) या युवा खेळाडूने हा अनोखा कॅच घेऊन दर्शकांच्या अंगावर काटे उभे राहतील असे प्रदर्शन करून सगळ्यांना दाताखाली जीभ धरण्यास भाग पाडले. समालोचकांनी वॅलेंटी हा सुपरमॅन असल्याचे सांगत त्याचे कौतुक केले.

आस्ट्रेलियाचा युवा खेळाडू वॅलेंटीचा अजब कॅच
विक्टोरियाचा फलंदाज अ‍ॅरोन फिंच आणि पीटर हॅड्सकॉम्ब सामन्याच्या २८व्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत प्रतिस्पर्ध्यांना रडकुंडीस आणले होते. दरम्यान दक्षिण आस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज केन रिचर्डसनने आपल्या ओव्हरचा ५वा चेंडू धीम्या गतीने टाकला, त्यावर पीटरने मिड ऑफवरून शॉट मारला दरम्यान काही क्षणात वॅलेंटीनं सुपरमॅन सारखी हवेत उडी घेत कॅच पकडला. विशेष म्हणजे वॅलेंटी चेंडूपासून थोड्या दूर अंतरावर होता. सध्या हा कॅच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून जगभर वॅलेंटीचे कौतुक होत आहे. वॅलेंटीच्या या कॅचमुळे संघाला फायदा झाला आहे.

कॅमरन वॅलेंटी कोण आहे ?
कॅमरन वॅलेंटीने ३ वर्षांआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तसेच कॅमरन वॅलेंटी हा फक्त २५ वर्षाचा असून ऑस्ट्रेलियाकडून अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये त्याने चांगली कामगिरी बजावली आहे. त्यामुळे त्याच्याकडे एक युवा खेळाडू म्हणून बघितले जाते. कॅमरन वॅलेंटीच्या नावावर दोन शतकांची नोंद असून अ श्रेणी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत ५४६ धावसंख्या असून ३४ विकेट त्याच्या नावावर आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like