Mayor Muralidhar Mohol | नळस्टॉप दुहेरी उड्डाणपूल रविवारपासून खुला, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mayor Muralidhar Mohol | पश्चिम पुण्याच्या वाहतुकीला (Pune Traffic) वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे (Nalstop Double Flyover) लोकार्पण येत्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार असून कर्वे रस्ता (Karve Road) आता वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेणार आहे. मेट्रोकडून (Pune Metro) हा पूल महापालिकेच्या (PMC) ताब्यात आल्यावर पुलाच्या विद्युत व्यवस्थेचेही काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी दिली.

 

महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांच्याकडे स्थायी समितीच्या (Standing Committee) अध्यक्षपदाची सूत्रे असताना महापालिकेच्या 2017-18 अंदाजपत्रकात या उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. वनाज (Vanaj) ते रामवाडी (Ramwadi) हा मेट्रो मार्ग प्रस्तावित झाल्यावर नळस्टॉप येथे दुमजली पूल साकारण्यासाठी महापौर मोहोळ यांनी पाठपुरावा करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन केले होते. जयपुर (Jaipur) येथील साकारलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना महापौर मोहोळ यांनी मांडली होती. त्यास आता मूर्त रूप आले आहे.

 

दुमजली उड्डाणपुलाच्या लोकार्पण याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘डेक्कन (Deccan) परिसरातून पश्चिम पुण्याकडे (West Pune) जाणाऱ्या वाहतुकीला या उड्डाणपुलामुळे चांगलीच गती मिळणार आहे.
नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला 35 ते 40 हजार वाहने जा-ये करत असल्याची नोंद होती.
त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. त्यासाठी उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला.
आता हा प्रकल्प सिद्धीस गेला आहे’.

‘नळस्टॉप येथील दुमजली उड्डाणपुलामुळे केवळ पश्चिम पुणेच नाही तर हवेली (Haveli Taluka)आणि मुळशी तालुक्याकडे (Mulshi Taluka) जाणाऱ्या वाहतुकीसही वेग येणार आहे.
पुण्यातील हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल असून याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याकडे आपला कल होता आणि त्या दृष्टीने यशदेखील आले आहे.
कोरोनाचे (Corona) संकट असतानाही मेट्रोने हे काम वेगाने पूर्ण केले.

 

असा आहे दुमजली उड्डाणपूल !

पुलाची एकूण लांबी 550 मीटर

पुलावरून 4 पदरी वाहतूक होणार

पहिल्या मजल्यावरून वाहने, दुसऱ्या मजल्यावर मेट्रो

मेट्रो आणि महापालिकेचा संयुक्त प्रकल्प

 

Web Title :- Mayor Muralidhar Mohol | Nalstop double flyover open from Sunday, Mayor Muralidhar Mohol informed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Congress Saurabh Amarale | सौरभ अमराळे पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी

 

7th Pay Commission | मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना होळीचे गिफ्ट, एवढा वाढू शकतो DA?

 

Best Exercise For Slim Body | शरिर सडपातळ करण्यासाठी करा ‘या’ एक्सरसाईज