Coronavirus Lockdown : भारतात ‘इथं’ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! मिळणार ‘तिप्पट’ पगार

मुंबई :  पोलिसनामा ऑनलाइन –  देशात सर्वात मोठ्या कमोडिटी एक्सचेंज MCX ने आपल्या शहरातील कार्यालयात काम करणाऱ्या काही खास कर्मचाऱ्यांना तीनपट पगार देणार आहेत. एमसीएक्स देशाचा सर्वात मोठा एक्सचेंज आहे. एक्सचेंजचे देशभरात ४०० कर्मचारी आहेत, ज्यातील ३०० मुंबई मुख्यालयात काम करतात.

एक्सचेंजच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मागच्या शुक्रवारपासून MCX ५० महत्वपूर्ण कर्मचारी कार्यालयातून काम करत आहेत. कार्यालयात त्यांना आवश्यक सुविधा दिली गेली आहे आणि सोबतच त्यांना एक्सचेंज भवनात थांबण्याची व्यवस्थाही केली आहे.

असे करणारे एमसीएक्स एकमात्र एक्सचेंज

अधिकाऱ्याने म्हटले की, “जे कर्मचारी जोखीम घेत आहेत याला समोर ठेऊन व्यवस्थापनाने त्यांना कमीत कमी दोनपट वेतन आणि काही प्रकरणात तीनपट वेतन देण्याचा निर्णय केला आहे.” अधिकाऱ्याने दावा केला की, एमसीएक्स असे करणारे एकमात्र एक्सचेंज आहे.

एसबीआय देखील देणार आहे एक्सट्रा पगार

एसबीआयनेही लॉकडाऊन दरम्यान काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना एक्सट्रा पगार देण्याची घोषणा केली असून २३ मार्चपासून १४ एप्रिल पर्यंतच्या तारखेची घोषणा यात केली गेली आहे. याअंतर्गत एसबीआयच्या प्रत्येक शाखेत काम करणाऱ्या CPCs, CACs, Treasury Operations, Global Markets, GITC आणि IT Services च्या लोकांना शामिल केले गेले आहे.