Meera Borawankar On Ajit Pawar | ‘अजित पवार यांच्याकडून पोलिसांच्या जमिनीचा लिलाव’, पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Meera Borawankar On Ajit Pawar | पुण्याचे माजी पोलीस आयुक्त (Former Pune CP) मीरा बोरवणकर यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात दादांनी येरवड्यातील पोलीस खात्याच्या जमिनीचा लिलाव करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याला त्यांनी विरोध केल्याचंही नमूद केलं. यानंतर यावरून राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली. (Meera Borawankar On Ajit Pawar)

काय आहेत अजित पवारांवर आरोप

पुणे पोलीस आयुक्तपदी मीरा बोरवणकर असतानाचे हे प्रकरण आहे. 2010 मधील या प्रकरणाचा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून केला आहे. हे पुस्तक रविवारपासून बाजारात येत आहे. या पुस्तकात अजित पवार यांचे नाव न घेता गंभीर आरोप करण्यात आला आहे. येरवडा येथे पोलिसांची असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरवर दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अजित पवार यांचे थेट नाव घेतले नाही. परंतु जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असे त्यात म्हटले आहे. या तीन एकर जागेवर पोलिसांचे कार्यालय होणार होते, असा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे. (Meera Borawankar On Ajit Pawar)

संजय राऊतांची टीका

आता ईडी या प्रकारावर काय करणार आहे. आता देवेंद्र फडणवीस काय करणार आहेत. आता आर्थिक गुन्हे शाखा काय करणार आहे. याबाबत आम्हाला प्रश्न विचारला जात आहे. मात्र, हा प्रश्न सरकारला आणि भाजप नेत्यांना विचारला पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे की, त्यांनी कोणत्या व्यक्तींना त्यांच्याबरोबर बसवलं आहे.

अजित पवार अन् 40 चोरांनी…

एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 चोर असो किंवा अजित पवार आणि त्यांचे 40 चोर असो,
त्यांनी कुणाबरोबर महाराष्ट्रात सरकार बुनवलं आहे.
एक ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हे कशाप्रकारे सरकारी जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत होते हे सांगितले आहे.
त्याच लोकांना फडणवीस त्यांच्या खांद्यावर घेऊन फिरत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोलीस भरतीसाठी बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, 10 तोतया उमेदवारांवर पुण्यात FIR