गाढव बांधून MG Hector ची ‘धिंड’, व्हिडिओ व्हायरल झाल्यानं कार मालकाविरूध्द होणार कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध ब्रिटिश कार निर्माता कंपनी एमजी मोटारने Hector SUV हे कारचे मॉडेल लॉन्च केले. या वर्षी भारतीय बाजारात कंपनीने पदार्पण केले, परंतू सोशल मिडियावर व्हायरल होतो तो या एसयूव्हीचा एक व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये कंपनी आणि कारची खल्लीच उडवण्याता आली. कंपनीने यावर नाराजी देखील व्यक्त केली आणि कार मालकावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले.

एका यूट्यूबवरुन 3 डिसेंबरला एमजी हेक्टरला एमजी हेक्टर लावून चालवण्यात येत असल्याचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. राजस्थानच्या उद्यपूर येथील विशाल पंचोली नावाच्या एका नाराज ग्राहकांना आपली गाडी चारही बाजूंना गाढव गाडी असे बॅनर लावले आणि कारला पुढे गाढव लावून कारची एक प्रकारे धिंड काढली.

पंचोली यांना कारच्या क्लचमध्ये काही समस्या जाणवत होती. कंपनीकडे तक्रार करुनही समस्येवर समाधान झाले नाही, समस्या शोधण्याऐवजी मलाच धमकवण्यात आले असा आरोप पंचाली यांनी व्हिडिओमध्ये केला. कंपनीने यावर नाराजी व्यक्त करुन सर्व आरोप नाकारले. ग्राहकाला जाणवणारी समस्या सोडवण्यासाठी योग्य ती सर्व पाऊले उचलण्यात आली होती, त्याच्या समस्येचे निराकरण करण्याचा सर्वोतपरी प्रयत्न सुरू होता. परंतू कंपनीकडून अयोग्य पद्धतीने फायदा उचलण्याचा ग्राहकाचा प्रयत्न आहे. याप्रकारामुळे आमच्यासारख्या प्रतिष्ठीत कंपनीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतो असे कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून त्या ग्राहकाविरोधात योग्य ती कारवाई करणार असल्याचे कंपनीकडून एका फेसबूक ग्रुपवर सांगण्यात आले.

एमजी हेक्टरच्या सर्व डिटेल्स –

कार दोन मॉडेलमध्ये लॉन्च करण्यात आली, त्यात दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन असा पर्याय उपलब्ध आहे. कंपनीने यात वायरलेस कनेक्टिव्ही देण्यात आली आहे. यात व्हाइस कमांडचे तंत्रज्ञान देण्यात आले आहे. येवढी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कार भारतातील पहिलीच कार आहे. कंपनीने दावा केला आहे की ही भारतातील पहिली कार आहे ज्यात 50 हून अधिक कनेक्टेड फीचर्स आहेत. एसयूव्हीत देण्यात आलेली ही सुविधा या श्रेणीत प्रथमच देण्यात आली आहे. हेक्टरच्या यशाचा परिणाम एमजी मोटार्सच्या भारतातील इतर कंपन्यांच्या कारवर देखील होईल.

हेक्टरमध्ये आयस्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात 10.4 टचस्क्रीन सुरक्षित, कनेक्डेट प्रवासाची खात्री देण्यास तयार आहे. हेक्टरमध्ये भारतीय रस्ते, वातावरण यानुसार अनेक बदल करण्यात आले आहेत. हेक्टरची हेडलाइटची रचना हॅरियर टाटा प्रमाणे आहे. गाडीत डायन्यामिक टर्न इंडिकेटर्स आहेत. पांढऱ्या एलईडी क्वाड प्रोजेक्टर हेडलाइट देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे फॉग लाइट म्हणून एलईडी देण्यात आले आहेत.

डॅशबोर्डवर, इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये लेदरचा वापर करण्यात आला आहे. गाडीच्या केबिनला प्रीमियम दर्जाच्या गाडीसारखे बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाडीच्या पुढच्या बाजूला डॅशबोर्ड आणि डोअर पॅडवर चांगल्या प्रतीच्या प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. गाडीचे केबिन मोठे आणि आरामदायी आहे. मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी पाय ठेवायला पुरेशी जागा देण्यात आली आहे. पुढची सीट गुडघ्याला लागत नसल्याने तीन जण व्यवस्थितरीत्या मागच्या सीटवर बसू शकतात. बसणाऱ्या व्यक्तीला पाय ठेवण्यासाठी कोणतीच अडचण येत नाही.

गाडीत फ्रंट आणि रिअर पार्किंग कॅमेरे, 360 अंशात चित्रीकरणाची क्षमता असणारा कॅमेरा देण्यात आला आहे. 7 इंचाचा ड्राइवर डिस्प्ले देण्यात आला असून एम्बिएन्ट लाइट दिली आहे. मोठा सनरूफ या गाडीच्या वैशिष्टय़ांमध्ये भर घालतो.

हेक्टरचे इंजिन –

कंपनीचा दावा आहे की हेक्टर पेट्रोल आवृत्तीला 1.5 लिटर टर्बो-चार्ज पेट्रोल इंजिनची देण्यात आले आहे. ज्यात 250 एनएमच्या पीक टॉर्कवर 143 पीएस शक्ती उत्पन्न करण्याची क्षमता आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन अशा दोन्ही स्वरूपात कार्यरत होईल. याचे 2.0 लिटर डिझेल इंजिन 350 एनएमच्या पीक टॉर्कवर 170 पीएस प्रदान करेल व सोबतच श्रेणीमधील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमताही प्रदान करेल.

कंपनीच्या मते 6-स्पीड डीसीटी- डीसीटी हे अतिशय प्रतिष्ठित व परिष्कृत ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आहे. इतर प्रकारांप्रमाणेच, डीसीटीलाही जागतिक स्तरावर खडतर पर्यावरणाच्या परिस्थितींमध्ये 2.6 दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त तपासण्यात आले असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

सुरक्षा – हेक्टरमध्ये सुरक्षेचा मोठ्या प्रमाणात विचार करण्यात आला आहे. गाडीत सुरक्षेसाठी दोन ऐअरबॅग, एबीएस, इबीडी, लहान बाळाची सीट ठेवण्यासाठी सुविधा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, ट्रक्शन कंट्रोल या सुविधा आहेत. टायरमधील हवेचा दाब पाहण्यासाठी टायर प्रेशर मॉनिटर देण्यात आला आहे. थंडी आणि दमट हवामानाचा परिणाम होऊ नये यासाठी हिटेड विंग प्रणालीचे आरसे देण्यात आले आहेत. गाडीच्या सर्व पर्यायांमध्ये या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गाडीच्या महागड्या पर्यायांमध्ये कर्टन एअरबॅगसह 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत.

खास आय स्मार्ट यंत्रणा –

ही टचस्क्रीन गाडीच्या कमांड सेंटरप्रमाणे काम करते. या टचस्क्रीनद्वारे तुम्ही गाडी नियंत्रित करू शकता. या गाडीत बोलून आदेश समजून घेण्याची यंत्रणा देण्यात आली आहे. हेक्टरमध्ये 10.4 इंचांची टचस्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीच्या मते ‘हॅलो एमजी’ म्हटल्यावर ही यंत्रणा कार्यरत होते. याद्वारे गाडीची वातानुकूलन यंत्रणा, संगीत प्रणाली नियंत्रित करता येऊ शकते. गाडीचे सनरुफ देखील बोलून आदेश देऊन नियंत्रित करता येते. गाडीला कनेक्टेड कार म्हटले असून गाडीची वातानुकूलन यंत्रणा आणि गाडीचे बूट तुम्ही घरी बसल्या नियंत्रित करू शकतात.

इंडिया एमजी मोटर –

एमजी मोटर म्हणजेच मॉरिस गॅरेजेस व्हेइकल्स ही कंपनी 1924 साली यूकेमध्ये स्थापित झाली. स्पोर्ट्स कार, कॅब्रिओलेट, रोडस्टर्स या प्रकारच्या गाड्या निर्मितीत कंपनीचा हतखंडा आहे. एमजी तिच्या भनाट स्टाईलमुळे लोकप्रिय आहे. ब्रिटिश पंतप्रधान तसेच ब्रिटीश राजघराणे देखील या कंपनीचे चाहते आहेत. कंपनीने एक विकसित ब्रॅंड तयार केला आहे, इंडियाच्या बाजारात शिरकाव केल्यानंतर कंपनीने हलोल गुजरातमध्ये आपल्या उत्पादन सयंत्रामध्ये उत्पादन सुरु केले आहे.