Lockdown Impact ! रेल्वे आणि रस्ते अपघातात 10 दिवसात 99 स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, 93 जण जखमी

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 24 मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाउन लागू आहे. याचा सर्वात जास्त परिणाम कामगार आणि गोरगरीबांवर झाला आहे. त्यांना केवळ खाण्यापिण्याच्या संकटाचा सामना करावा लागला नाही तर त्यांच्या कामावरही मोठा परिणाम झाला आहे. म्हणूनच ते आपापल्या गावी स्थलांतर करत आहेत. स्थलांतरित कामगारही अपघातांना बळी पडत आहेत. गेल्या 10 दिवसात आतापर्यंत 99 मजुरांचा मृत्यू आणि 93 कामगार जखमी झाले आहेत.

चला या अपघातांचा आढावा घेऊः –

1. मध्यप्रदेश – सागर जिल्ह्यात झालेल्या अपघातात 5 मजुरांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाले आहेत. सर्वजण उत्तरप्रदेशातील राहणार होते. महाराष्ट्रातून ते स्वगृही जात असताना हा अपघात 16 मे रोजी झाला आहे.

2. शनिवारी (16 मे) सकाळी उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात एका ट्रकने प्रवासी मजुरांनी भरलेल्या डीसीएमला धडक दिली. या अपघातात आतापर्यंत 24 कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 35 लोक जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात आणि सैफई पीजीआय येथे पाठविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन घटनास्थळी उपस्थित आहे.

3. यापूर्वी गुरुवारी गुना येथे झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाला. कामगारांनी भरलेल्या मिनी ट्रकने बसला धडक दिली. त्या अपघातात 7 कामगार जागीच मरण पावले. या अपघातात सुमारे 55 कामगार जखमी झाले आहेत.

4. बुधवारी रात्री 11:45 वाजता उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात रोडवेज बसने कामगारांना पायदळी तुडविले. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 4 मजूर जखमी असल्याचे सांगण्यात आले. मारले गेलेले सर्व कामगार बिहारमधील गोपाळगंज येथील रहिवासी होते. ते सर्व पंजाबहून पायी घरी परतत होते.

5. 10 मे रोजी मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात झालेल्या एका अपघातात 5 कामगारांना आपला जीव गमवावा लागला. नरसिंगपूर जिल्ह्यातील मुंहवानी पोलिस ठाण्याच्या पाठा गावाजवळ आंब्याने भरलेला ट्रक अनियंत्रित पलटी झाला. या ट्रकमध्ये 20 मजूर होते, जे हैदराबादहून उत्तर प्रदेश एटा व झाशी येथे जात होते. ट्रकमध्ये 5 कामगारांचा मृत्यू झाला, तर 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

6 . महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे 16 प्रवासी मजूरांचा मृत्यू झाला. अपघातात प्राण गमावलेली सर्व 16 मजूर मध्य प्रदेशातील होती. त्यापैकी 11 जण शहडोल जिल्ह्यातील आणि 5 उमरिया जिल्ह्यातील होते. हे सर्व कामगार औरंगाबादहून मध्य प्रदेशातील मूळ जिल्ह्यासाठी पायी निघाले होते. सुमारे 40-45 किमी चालल्यानंतर ते सर्व औरंगाबाद-जालना रेल्वे ट्रॅकवर झोपले होते.