सोमालिया : मोगादिशुच्या एका हॉटलमध्ये दहशतवादी हल्ला, 7 लोकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

मोगादिशु : सोमालियाची राजधानी मोगादिशु येथील हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार हल्ला करणारे संशयीत अल शबाब ग्रुपशी संबंधीत असल्याचे म्हटले जात आहे. अल शबाब ग्रुप, दहशतवादी संघटना अल कायदाचा एक भाग आहे.

सुरक्षा अधिकारी अहमद उमर यांनी न्यूज एजन्सी एएफपीला सांगितले की, हल्ला सुरू झाल्यानंतर सुरक्षा दलांनी हॉटेलवर नियंत्रण मिळवले आहे. हल्लेखोरांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले असल्याचे दिसत आहे. अजूनही काही प्रमाणात गोळीबार सुरू आहे.