MIM MP Imtiyaz Jaleel | ‘पंकजा मुंडेंनी स्वतःचा पक्ष काढल्यास महाराष्ट्रात भूकंप येईल, गरज पडली तर…’ – इम्तियाज जलील

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – MIM MP Imtiyaz Jaleel | भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी वेगळा पक्ष काढावा असा सल्ला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiyaz Jaleel) यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad News) बोलताना खासदार जलील यांनी पंकजांच्या राजकीय भविष्याबाबत मोठं वक्तव्य केलं असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

 

खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiyaz Jaleel) म्हणाले, “भाजपा (BJP) आज इतका मोठा पक्ष कुणामुळे झाला आहे हे सर्वांना माहितीय. देशात एकेकाळी या पक्षाचे 2 खासदार होते. लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांनी देशात तर गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला. राज्यात भाजपा पक्ष वाढविण्यात गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा मोलाचा वाटा आहे. एकनाथ खडसेंची आज काय अवस्था केली ते ठावूकच आहे. तिच परिस्थिती आज पंकजा मुंडे यांच्यासोबत होतेय, हे उघड आहे. पंकजाचं दुर्दैव हे आहे की तिला तिची ताकद कळून येत नाही. महाराष्ट्रात ओबीसी समाजाची (OBC Community) मोठी लोकसंख्या आहे. पंकजांनी जर ठरवलं तर त्या स्वत: वेगळा पक्ष काढू शकतात. त्यांच्यामागे एक मोठा समाज उभा राहू शकतो. त्यांनी स्वत:ची ताकद आजमावून पाहायला हवी.”

पुढे बोलताना जलील म्हणाले, “गोपीनाथ मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. पंकजांसाठी विधान परिषद म्हणजे खूप लहान गोष्ट आहे. त्यांनी हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष काढावा आणि मग ताकद काय असते ती बघावी. ओबीसींची आज अवस्था अशी झालीय की त्यांचा नेता नेमका कोण आहे हेच माहित नाही. पंकजा यांनी जर वेगळा पक्ष स्थापन केला तर भाजपामध्ये मोठा भूकंप येईल, असंही जलील म्हणाले. छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) असं वाटत असेल की ते ओबीसींचे नेते आहेत तर तसं नाही किंवा खडसे देखील ओबीसींचे नेते नाहीत. उद्या पंकजांनी जर वेगळा पक्ष स्थापन करुन ओबीसी समाजाची ताकद निर्माण केली तर मोठा भूकंप होईल.”

 

दरम्यान, “पंकजा मुंडे यांनी जर वेगळा पक्ष काढून ओबीसी समाजाची ताकद निर्माण केली तर आम्ही नक्कीच त्यांच्यासोबत युतीचा विचार करू.
कारण एमआयएमचं कुणासोबत जुळू शकेल तर तो दलित आणि ओबीसी समाज आहे. कारण तोही एक वंचित समाज राहिलेला आहे.
भाजपानं पंकजांना स्पष्ट संदेश दिला आहे की खडसेंची जी अवस्था केली ती तुमचीही करू.
पण गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजासाठी केलेलं काम लोक विसरलेले नाही.
त्यामुळे तुमच्या पाठिमागे काय ताकद आहे
हे एकदा पंकजा मुंडे यांनी बाहेर फिरून बघायला हवं आणि धाडस दाखवायला हवं,” असंही जलील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- MIM MP Imtiyaz Jaleel | BJP leader pankaja munde should form new party says mim mp imtiaz jaleel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rupali Chakankar | ‘मीच तुमच्याकडे तुमच्यावरच्या अश्लील Comment ची तक्रार करतो’; महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना पत्र

 

Maharashtra Crime News | धक्कादायक ! मुलानेच जन्मदात्या वडिलांवर कोयत्याने सपासप वार करून केला खून; परिसरात खळबळ

 

Gopichand Padalkar On Supriya Sule | ओबीसी आरक्षणावर गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ शेअर करत साधला निशाणा; म्हणाले – ‘एका अर्थी मला आनंद..’