4 नराधमांनी मुलीचे अपहरण करुन केला 3 दिवस सामुहिक ‘बलात्कार’, गावकरी ‘सुन्न’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – घराच्या समोरुनच एका अल्पवयीन मुलीचा चार मुलांनी अपहरण करुन तीन दिवस सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या नराधमांच्या जाळ्यातून या अल्पवयीन मुलीने धैर्याने पळ काढला आणि घरी पोहचली. यानंतर नातेवाइकांबरोबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर या चार नराधमांना अटक केली. ही मनाला हेलावून टाकणारी घटना पंजाबच्या बरनाला जिल्ह्यात घडली.

बरनाला गावातील 4 मुलांनी तीन दिवस या मुलीवर बलात्कार केला. 29 तारखेला सकाळी चार आरोपींनी या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. मंगळवारी मुलगी या आरोपींच्या कचाट्यातून सुटली. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी माहिती पीडित मुलीच्या काकांनी चरणजीत सिंह यांनी दिली. या घटनेची माहिती जेव्हा गावात पसरली तेव्हा गावातील लोक देखील सुन्न झाले.

मुलीच्या काकांनी सांगितले की मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. परंतू पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. आता प्रकरण उघड झाल्यानंतर मुलीच्या नातेवाइकांनी आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन कठोर शिक्षेची मागणी केली. पीडिताच्या आईने सांगितले की, त्यांची मुली आणि वडील आजारी असतात. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती, परंतू वेळेत कारवाई करण्यात आली नाही. त्यांनी पंजाब सरकारकडे आणि पोलिसांकडे आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

या प्रकरणी तपास करणाऱ्या डीएसपी बलजीत सिंह बराड यांनी सांगितले की मुलीचे 29 सप्टेंबरला आरोपींनी अपहरण केले होते. त्यानंतर या आरोपींनी तीन दिवस या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींमधील गुरप्रीत सिंह याला ताब्यात घेतले आहे तर तीन आरोपी फरार आहे. लवकरच बाकी आरोपींना ताब्यात घेण्यात येईल.

 

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या