31 डिसेंबरला मोदी सरकारची ‘ही’ खास स्कीम बंद होणार ! तुमच्या जवळ ‘फक्त’ 15 दिवस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सर्विस टॅक्स किवां एक्साइज ड्यूटी संबंधित विवादामध्ये अडकलेले असाल तर तुम्ही 31 डिसेंबरपूर्वी यावर तोडगा काढण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. अर्थ मंत्रालयाकडून ‘सगळ्यांचा विश्वास योजनेची’ अंतिम तारीख वाढिवली जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अशा प्रकारचे वाद सोडवण्यासाठी अर्थ मंत्रालयाने ही योजना सुरु केलेली होती आणि त्याची अंतिम तारिक 31 डिसेंबर 2019 आहे.

केवळ 4 महिन्यांसाठी होता कालावधी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2019 – 20 या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात ही योजना आणली होती. या योजनेमागील मंत्रालयाचा हेतू असा होता की थकबाकीदारांना काही अंशतः सूट देऊन असे सर्व वाद मिटवावेत. 1 सप्टेंबर 2019 पासून सरकारने ही योजना केवळ 4 महिन्यांसाठी लागू केली.

योजनेचा कालावधी वाढवला जाणार नाही
या योजनेचा कालावधी लवकरच संपणार आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार सरकार या योजनेचा कालावधी वाढवू इच्छित नसल्याचे समजते. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 31 डिसेंबर पर्यंतचा अंतिम वेळ आहे.

आतापर्यंत 55 हजार 693 अर्ज दाखल
या योजनेंतर्गत सरकारला आतापर्यंत एकूण 55 हजार 693 अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये 29.557.3 कोटी रुपयांचा कर विवादास्पद आहे. अर्थ मंत्रालयाने ही योजना सुरू केली तेव्हा, त्यासंबंधी एकूण 1.83 लाख कर बाकी होते, त्यापैकी सुमारे 3.5 लाख कोटी अडचणीत आहेत.

या योजनेअंतर्गत टॅक्स धारकांना 40 ते 70 % सूट मिळते. त्याचप्रमाणे व्याज आणि दंडापासून देखील दिलासा मिळतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/