Supreme Court | शिंदे-फडणवीस सरकारला ‘सुप्रीम’ दणका, BMC वॉर्ड फेरबदलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश;

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा झटका दिला आहे. मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) वॉर्ड पुनर्रनचा जैसे थे ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. महाविकास आघाडी सरकारने बीएमसीसाठी 236 वॉर्ड केले होते. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने ही संख्या कमी करुन 227 केली होती. शिंदे-फडणवीसांच्या निर्णयाला शिवसेनकडून (Shivsena) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आव्हान दिलं होतं. कोर्टाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलासा मिळाला आहे. कारण ठाकरे सरकारचा 236 वॉर्डचा निर्णय राज्य सरकारने बदलला होता. परंतु आता कोर्टाने याला स्थगिती दिली आहे.

 

शिंदे-भाजप सरकार अस्तित्वात येताच 2017 मध्ये ज्या 227 वॉर्डनुसार निवडणुका झाल्या होत्या. त्याच पद्धतीने निवडणुका घेण्याचा अध्यादेश शिंदे सरकारने काढला. तर यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने या वॉर्ड (BMC Election Ward) पुर्रचनेसंदर्भात निर्णय घेत 236 वॉर्ड पाडत निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. सरकार येताच हा निर्णय बदलण्यात आला. याला शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आव्हान देण्यात आले होते.

 

शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
हा निर्णय न्याय देणारा आहे. महिना दीड महिन्यापूर्वी ज्या नगरविकास मंत्र्यांनी वॉर्ड पुनर्रचनेचा आदेशावर सही केली, तेच आजही नगरविकास मंत्री आहेत. मग या काळात असं काय बदललं, त्यांनीच नंतर विरोध केला. न्यायदेवतेनं आम्हाला न्या दिला आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिली आहे.

बीएमसीमधील एकूण 236 वॉर्ड असे असतील

आरक्षण (Reservation)

खुला प्रवर्ग – 219
एससी (SC) – 15
एसटी (ST) – 02

 

महिला जागा

खुला प्रवर्ग – 118
एससी – 08
एसटी – 01

 

Web Title :- Supreme Court | bmc election 2022 ward prabhag eknath shinde devendra fadnavis government supreme court says ward reorganization in bmc kept as it is

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Har Ghar Jal Campaign | ‘हर घर जल’ अभियान ! महाराष्ट्राचे 9 जिल्हे -1,500 पेक्षा जास्त गावातील प्रत्येक घरात पोहचले नळाचे स्वच्छ पाणी

 

Tomato Fever In India | वेगाने पसरत आहे Tomato Fever, जाणून घ्या लक्षणे? या लोकांना आहे धोका

 

BJP Chandrashekhar Bawankule | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळेंच्या विधानाने शिंदे गटातील खा. प्रतापराव जाधव यांची धाकधूक वाढली