मूकबधीर महिलेबरोबर गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मुकी व बहिरी असलेल्या महिलेबरोबर गेलेल्या पंधरा वर्षीय मुलीला आडोशाला नेऊन शारीरिक अत्याचार करण्यात आला. संगमनेर तालुक्यात ही संतापजनक घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील बाळेश्वर परिसरात राहणारी एक १५ वर्षाची अल्पवयीन मुलगी तिच्या मुकी व बहिरी असलेल्या नातेवाईक महिलेबरोबर सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. नातेवाईक महिला थोडी आडबाजूला गेली असता त्याचवेळी अचानक १५ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीपेक्षा वयाने मोठा असलेला एक तोंडाला रुमाल बांधलेला मुलगा तेथे आला. अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिला फरपटत आडोशाला नेले व तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला.

पीडित मुलीच्या आईला चार दिवसांपूर्वी हा प्रकार समजला. तेव्हा अल्पवयीन मुलगी ही गरोदर असल्याचे समजून आले. तेव्हा काल या प्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन तोंडाला रुमाल बांधलेल्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा पोस्को कायद्यांतर्गत घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो तरुण मुलगा नेमका कोण याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Visit : Policenama.com