Miraj Crime | मिरजमध्ये तरुणाचा धारदार हत्याने वार करून निर्घृण खून; परिसरात खळबळ

मिरज : पोलीसनामा ऑनलाइन – Miraj Crime | सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये एका तरुणाचा धारदार हत्याराने सपासप वार करून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मिरजमधील (Miraj Crime) सांगलीकर मळा येथे घडली असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी (Miraj Police) घटनास्थळी धाव घेतली.

 

ऋषिकेश बाळासाहेब जाधव Rishikesh Balasaheb Jadhav (वय 25, रा. घोरपडे वाडा, मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ऋषिकेश याचा मृतदेह सांगलीकर मळा (Sanglikar Mala) येथील रिकाम्या जागेत आढळून आला. हल्लेखोरांनी ऋषिकेशचा धारदार हत्याराने निर्घृण खून करून चेहरा चेंदामेंदा केला आहे. ऋषिकेश याचा रात्रीच्या सुमारास खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, परंतु हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Miraj Crime)

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बसवराज तेली (SP Basavaraj Teli),
पोलीस उपअधीक्षक अजित टिके (DySP Ajit Tike), पोलीस निरीक्षक संजीव झाडे (Police Inspector Sanjeev Zade)
यांच्यासह श्वानपथक व पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. मृत तरुणाच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा करण्यात
आल्याने पोलिसांनी कपड्यावरून नातेवाइकांचा शोध घेऊन मृतदेहाची ओळख पटवली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

Web Title :- Miraj Crime | murder of a young man in miraj in sangli with a sharp weapon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Akshay Kumar | अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील लुक आला समोर; दिग्दर्शकाने केली खोचक टिप्पणी

Kirit Somaiya | ‘साई रिसॉर्टची चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा’ – किरीट सोमय्या

Pune Pimpri Crime | लग्नासाठी आणलेल्या दागिन्यांच्या बॅगेवर चोरट्यांचा डल्ला; 27 लाखांचा मुद्देमाल लंपास, बालेवाडी येथील घटना