तब्बल 38 वर्षांनंतर स्टेजवर जिवंत होणार ‘डिस्को डान्सर’, मुंबई आणि दिल्लीतील प्रेक्षक बनणार ‘साक्षीदार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रेक्षकांना पुन्हा एकदा डिस्को डान्सर सिनेमाची झलक पाहायला मिळणार आहे. याचा लाईव परफॉर्मंस संगीतमय पद्धतीनं मुंबईत 26 ते 29 मार्च दरम्यान केला जाणार आहे. दिल्लीत 17 ते 19 एप्रिलदरम्यान याचं आयोजन केलं जाणार आहे. बप्पी लहरीनं याचे साऊंड ट्रॅक कंपोज केले होते. कंपोजर समीर सुलेमान हे गाणं पुन्हा रचणार आहे. या रंगारंग कार्यक्रमात कास्टींपासून तर कोरियोग्राफी, कॉस्ट्युम्स आणि डिझाईन असं साऱ्यालाच ग्लॅमरचा भरपूर तडका देण्यात आला आहे. सारेगामा इंडियाच्या बॅनरखाली हे लाईव सादरीकरण केलं जाणार आहे.

सारेगामा इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर विक्रम मेहरा याबाबत बोलताना म्हणाले की, “डिस्को डान्सरचा आपल्या काळात खूप प्रभाव होता. अनेकांच्या मनात हे आजही ताजं असेल यात शंका नाही. डिस्को डान्सर नव्या अंदाजात स्टेजवर सादर केलं जाणार आहे. हा एक भव्य शो असणार आहे. इंडस्ट्रीतील अनेक बडे कलाकार या शोचा हिस्सा असणार आहे. कारवा म्युझिकल्सचं प्रॉडक्शन याची सुरुवात करण्यासाठी खूप उत्साहित आहे. भविष्यात अनेक गाणी, डान्स आणि म्युझिक होणार आहे. पुढील वर्षात सुभाष घईच्या कर्ज सिनेमाचा एक लाईव म्युझिक इवेंट स्टेजवर लाँच केला जाईल.”

बब्बर सुभाष दिग्दर्शित सिनेमा डिस्को डान्सर 1982 साली रिलीज झाला होता. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, राजेश खन्ना, गीता सिद्धार्थ, ओम पुरी आणि कल्पना अय्यर प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमातील आय अ‍ॅम अ डिस्को डान्सर, जिम्मी जिम्मी जिम्मी आजा आणि औवा औवा काई यहा नाचे ही गाणी खूपच लोकप्रिय झाली होती.