MLA Devendra Bhuyar | ‘माझ्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार, उद्धव ठाकरे सक्षम आहेत पण…’ – आमदार देवेंद्र भुयार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Devendra Bhuyar | एकीकडे राज्याच्या राजकारणात भूकंप होत असतानाच अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माझ्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आहेत. ते मुख्यमंत्री झाले तर तो सर्वात आनंदाचा क्षण असेल, असं भुयार यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सक्षम आहेत. पण वेळेची आणि भेटीची अडचण आहे, त्यांनी आम्हला वेळ द्यावा हीच मागणी असल्याचं भुयार यांनी म्हटलं आहे.

 

“एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नॉट रिचेबल आहेत. त्याबद्दल आम्ही वस्तुस्थिती तपासू. मात्र शिंदे साहेब हे आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. गद्दारी त्यांच्या रक्तात नाही. ते काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटत नाही,” अशी देखील प्रतिक्रिया आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांनी दिली.

 

“एकनाथ शिंदे अतिशय प्रामाणिक, सर्वाधिक काम करणारे मंत्री, ते काही चुकीचं करतील असा वाटत नाही. सरकारला कुठलाही धोका नाही, या सर्वांचा बाप सिल्वर ओक वर बसलेला आहे. भाजपचे (BJP) सर्वच नेते एकमेकांच्या संपर्कात राहतात त्याचा अर्थ असा नाही की शिंदे काही चुकीचा निर्णय घेतील.’ तसेच, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभा निवडणुकीत उघडपणे आमचे नाव घेतले आता त्यांच्याच पक्षातील तीन आमदारांनी मतं दिली नाहीत, आता राऊत काय निर्णय घेतात ते पाहू,” असंही भुयार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे.
हे बंड आता तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे 40 आमदार शिंदेंसोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
त्याचबरोबर एकनाथ शिंदेसह संबधित आमदार आसामच्या गुवाहटी येथे दाखल झाले आहेत.
दरम्यान एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे.

 

Web Title :- MLA Devendra Bhuyar | MLA devendra bhuyar on ajit pawar for cm maharashtra udhhav thackeray maharashtra politics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल…’ – संजय राऊत

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

 

Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण