MLA Prakash Surve | ‘हात तोडता आला नाही तर पाय तोडा’, शिंदे गटातील आमदाराचे चिथावणीखोर वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवं सरकार आलं. तेव्हापासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील (Shinde Group) नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांनी दहिसरमधील एका कार्यक्रमात चिथावणीखोर वक्तव्य केले. ‘हात तोडता आला नाही तर पाय तोडा’ अशा शब्दांत आमदार प्रकाश सुर्वे यांनी चिथावणीखोर व प्रक्षोक्षक भाषण केलं.

 

दरम्यान आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये भडकाऊ भाषण केल्यामुळे ठाकरे गटातील (Thackeray Group) शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशनमध्ये (Dahisar Police Station) तक्रार दाखल केली आहे. प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करुन त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

 

काय म्हणाले प्रकाश सुर्वे ?

आपण गाफिल राहायचं नाही. यांना त्यांची जागा दाखवून द्यायची.
कुणी आरे केले तर त्याला कारे करा आणि ठोकून काढा प्रकाश सुर्वे इथे बसला आहे. हात नाही तोडता आला तर पाय तोडा.
दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करुन देतो. असे आमदार प्रकाश सुर्वे यांनी म्हटले आहे. आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही.
पण आमच्या अंगावर कुणी आले तर त्याला शिंगावर घेऊन कोथळा फाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुर्वे यांनी दिला.

 

Web Title : –  MLA Prakash Surve | shivsena eknath shinde group dahisar mla prakash surve provocative speech

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा