Vinayak Mete Death | विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीचा मृत्यूवर संशय, म्हणाल्या…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसंग्राम संघटनेचे (Shiv Sangram President) नेते विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांचे काल पहाटे पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर (Pune-Mumbai Express Highway) अपघाती निधन झाले. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवर (Vinayak Mete Death) त्यांची पत्नी डॉ. ज्योती मेटे (Wife Jyoti Mete) यांनी संशय व्यक्त केला आहे. मेडिकल टर्मिनोलॉजी नुसार (Medical Terminology) मृत्यूनंतर एवढ्या लगेच चेहरा पांढरा पडत नाही, काही काळानंतर चेहरा पांढरा पडायला सुरुवात होते, पण साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता, असं ज्योती मेटे यांनी सांगितले.

 

अपघाताची (Accident) घटना घडल्यानंतर नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या आणि वैद्यकीय टर्मिनोलॉजीच्या आधारे त्यांनी विनायक मेटेंच्या निधनाबाबत (Vinayak Mete Death) संशय व्यक्त केला आहे. ज्योती यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, मला जेव्हा घटनेची माहिती मिळाली, तेव्हा मी अक्षरश: धावत सुटले. मी विश्वास नांगरे पाटलांना (Vishwas Nangre Patil) फोन केला, माझा भाऊ देखील उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आहे, मी त्यालाही फोन केला. पण दोघांनीही कॉल उचलला नाही.

 

शेवटी मी वाहतूक पोलिसांना (Traffic Police) फोन केला. कारण चालक मला सांगत नव्हता की तो नेमका कुठे आहे ? त्याला नेमकं ठिकाण सांगता येत नसेल, तर तू व्हॉट्सअ‍ॅपवर लोकेशन पाठव… असं मी त्याला सांगत होते. पण त्याने तसं केलं नाही. शेवटी मला वाहतूक पोलिसांकडूनच कळालं की साहेबांना एमजीएम कामोठे रुग्णालयात (MGM Kamothe Hospital) दाखल केलं आहे. मी रुग्णालयात पोहोचेपर्यंत तेही तिथे पोहचले होते.

मी स्वत: डॉक्टर असल्यामुळे साहेबांना पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की काहीतरी वाईट घडलंय. कारण मेडिकल टर्मिनोलॉजीनुसार मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही. काही वेळ गेल्यानंतर तो पांढरा पडतो. पण साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता. त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्त येत होतं. रुग्णालयात गेल्यावर मी त्यांच्या नाडीचे ठोके तपासले. त्याठिकाणी डॉक्टरही होते, त्यांनी मला बाहेर जाण्यास सांगितले. पण मी विनायक मेटेंची बायको आणि डॉक्टर असल्याचं सांगितलं. त्यांनंतर त्यांनी मला तिथे थांबण्याची परवानगी दिली. मी साहेबांच्या हाताची आणि मानेची नाडी तपासली, पण ती हाताला लागली नाही. ईसीजी मध्ये कोणत्याही हालचाली दिसत नव्हत्या, असं ज्योती मेटे यांनी सांगितले.

 

ज्योती मेटे यांनी पुढे सांगितले, त्यानंतर मी माझ्या भावाला सांगितलं की, हे थोड्या वेळापूर्वी घडलेलं नाही.
मला फोन आल्यानंतर मी जवळपास पाऊण तासात याठिकाणी पोहोचले.
पण ही पाऊण तासापूर्वी घडलेली घटना नव्हती, ही घटना घडून किमान दोन तास उलटले होते,
म्हणजे आमच्यापासून काहीतरी लपवलं जात होतं.
कदाचित ते लपवत ही नसतील, मीच भयाकुल असेल, नेमकं काय असेल ? हे मला माहीत नाही.
पण मला फोन येण्यापूर्वी अपघाताची घटना घडून वेळ झाला होता.
आता शवविच्छेदन अहवालातून समोर येईल, त्यांच्या मृत्यूची नेमकी वेळही समजेल.

 

Web Title : –  Vinayak Mete Death | shivsangram leader vinayak mete death wife and doctor jyoti mete statement on accident

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा