MLA Prasad Lad | अरविंद केजरीवाल एक नंबरचे नौटंकीबाज मुख्यमंत्री, नोटांवर लक्ष्मी व गणपती छापण्याच्या मागणीवर प्रसाद लाड यांचे टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारला एक अजब सूचना केली आहे. भारतीय चलनी नोटांवर (Currency) राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्यासोबत श्रीगणेश (Ganpati) आणि लक्ष्मी (Lakshmi) यांच्या प्रतिमा छापण्यात याव्यात, अशी मागणी केजरीवाल यांनी केली. त्यावर भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल काहीतरी बोलून लोकांचे लक्ष विचलीत करत आहेत, असे प्रसाद लाड (MLA Prasad Lad) म्हणाले.

 

अरविंद केजरीवाल एक नंबरचे नौटंकीबाज मुख्यमंत्री आहेत. निवडणुका आल्या की भूमिका बदलणारा नेता कोण असेल, तर ते अरविंद केजरीवाल आहेत. त्यामुळे आगामी हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ते आता हिंदुत्ववादी नेता असल्याचे भासवत आहेत. भविष्यात गुजरातच्या निवडणुका असल्याने असे काहीतरी बोलून केजरीवाल लोकांचे लक्ष विचलीत करण्याचे काम करत आहेत, असे प्रसाद लाड (MLA Prasad Lad) म्हणाले.

यावेळी प्रसाद लाड यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दौऱ्यावर भाष्य करत त्यांच्यावर टीका केली आहे.
मागील दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) औरंगाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत.
त्यावर लाड म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अडीच तासांचा दौरा हा पर्यटन दौरा होता.
अडीच वर्षात त्यांनी किती प्रश्न सोडविले? त्यांनी शेतकऱ्यांना किती मदत केली? परळमध्ये एका आजीला भेटायला उद्धव ठाकरे गेले होते.
त्यांच्या कुटुंबाला नोकरी देऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले होते. पण आता फराळाचा डबा ही दिला नसेल.
कोणत्या मनोवृत्तीचे मन असलेली ही व्यक्ती आहे? आमचे सरकार हिंदू सण साजरे करणारे सरकार आहे.
आमच्या सरकारमध्ये लोक सण साजरे करत आहेत. मागच्या सरकारमध्ये लोकांनी सण साजरे केले नाहीत.

 

Web Title :- MLA Prasad Lad | bjp prasad lad criticize arvind kejrival

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ameya Khopkar | हिंदूंचे सण हिंदुस्थानात नाहीतर काय पाकिस्तानात जाऊन साजरे करायचे का? – अमेय खोपकर

NCP MLA Nilesh Lanke| राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे असतील, निलेश लंके यांचे सूचक विधान

Kishori Pednekar | उद्धव ठाकरे उशिरा का होईना दौऱ्यावर गेले, किशोरी पेडणेकरांचा शिंदे-फडणवीसांना टोला