MLA Ravi Rana | ‘शरद पवारांचा मोदींना पाठिंबा…’, अजित पवार – अमित शहा भेटीवर रवी राणांचे आश्चर्यकारक विधान

अमरावती : MLA Ravi Rana | काल पुण्यात अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर पुण्यातच शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या कौटुंबिक कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. यानंतर अजित पवार थेट दिल्लीला गेले आणि तिथे त्यांनी भाजपा (BJP) नेते आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीबाबत भाजप समर्थक आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी आश्चर्यकारक दावा केला आहे.

भाजपा समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मोठे वक्तव्य केले आहे. रवी राणा म्हणाले की, मी दसऱ्याच्या काळातच सांगितले होते की, दिवाळीच्या आसपास मोठा बॉम्ब फुटू शकतो. अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यावरून मला असे वाटते की, शरद पवार ९९.९९ टक्के राजी झाले आहेत.

रवी राणा (MLA Ravi Rana) म्हणाले, आता फक्त थोडा धक्का लागला पाहिजे. त्यानंतर शरद पवारही
पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पाठिंबा देतील. भाजपाबरोबर येतील. तसेच शरद पवार आणि अजित
पवार यांच्यातील संघर्ष संपेल. त्यामुळे शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्रात शक्तीशाली सरकार येईल. (MLA Ravi Rana)

रवी राणा म्हणाले, दिल्लीच्या स्तरावर राजकीय समीकरणे तयार होत आहेत. आजपर्यंत ज्या घटना घडल्या त्या
अचानक झाल्या आहेत. शरद पवारही भाजपाबरोबर आले, तर ताकद मिळेल आणि महाराष्ट्रात मजबूत, सक्षम सरकार येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP – MNS | ‘…तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा’, दिवाळी कार्यक्रमावरून भाजप-मनसेत जुंपली!

Pune Crime News | पुण्यातील भाजपाचे माजी नगरसेवक उदय जोशी यांना ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा, जामीन मंजूर

The Poona Merchants Chambers | खाद्यान्न एफएसएसएआय नविन व नुतणीकरण परवान्यांची मुदत पुन्हा पाच वर्षांसाठी; दि पूना मर्चंट्‌स चेंबरच्या पाठपुराव्याला यश

Naal 2 | अवघ्या महाराष्ट्राला ‘नाळ 2’ मधल्या निरागस चिमीने लावलं वेड, जाणून घ्या कशी भेटली चिमी ?