MLA Rohit Pawar | रोहित पवारांचा एकाच वेळी दोघांवर निशाणा, म्हणाले – ‘अजितदादा अर्थमंत्री, पण फडणवीसांनी निधी रोखला’

मुंबई : MLA Rohit Pawar | अर्थमंत्री अजितदादा (Ajit Pawar) आहेत, पण फडणवीसांच्या संमतीशिवाय निधी मिळत नाही. हा आपल्या समकक्ष असलेल्या अजितदादांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार आहे, असा खळबळजनक खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी केला आहे.

आमदार रोहित पवार हे अनेकदा अजित पवारांवर थेट टीका करण्याचे टाळतात. आता, पुन्हा एकदा त्यांनी अजित पवार यांच्यावर थेट टीका करणे टाळले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) आरोप करत अजित पवारांवर देखील निशाणा साधला आहे.

रोहित पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघात कर्जत आणि जामखेड येथील दोन्ही शासकीय रुग्णालयांचे काम अर्धवट झालेय, निधीअभावी हे काम ठप्प पडलेय. अर्थमंत्री अजितदादा आहेत, मात्र या रुग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही, अशा सूचना फडणवीस साहेब आपण दिल्यात. हा आपल्या समकक्ष असलेल्या अजितदादांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार आहे. तो योग्य वाटत नाही.

यावेळी रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी फडणवीसांना सवाल केला की,
उपचाराअभावी एखाद्याचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी आपण आणि आरोग्यमंत्री घेणार का?

रोहित पवार म्हणाले, राजकारण आपण नेहमीच करतो. पण, ते विचारांचे आणि तत्त्वांचे असावे.
राजकारणात सामान्य माणूस भरडला जाऊ नये, हे आपल्यासारख्या मोठ्या नेत्याला सांगण्याची वेळ यावी, यापेक्षा दुर्दैव ते काय.

पवार यांनी राज्य सरकारचे (State Government) वाभाडे काढताना म्हटले की,
हे शेअर केलेले फोटो बघितले तर इतके काम होऊनही १ रुपयाही निधी दिलेला नाही.
अशीच अवस्था राज्यातील इतर २६ कामांची आहे. मायबाप सरकार हे आपल्याला तरी योग्य वाटते का?
असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं – माझं बलिदान…