MLA Vaibhav Naik | आमदार वैभव नाईक नितेश राणेंच्या विरोधात आक्रमक, म्हणाले- ‘आता नितेश राणेला धडा शिकवण्याची वेळ आली’

कुडाळ : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांच्यावर सध्या लाचलुचपत विभागाची (ACB) कारवाई सुरु आहे. त्यांच्या समर्थनार्थ आज कुडाळ तालुक्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यापासून नारायण राणे (Narayan Rane) आणि सुपुत्र यांच्यावर टीका केली. त्याला उत्तर देताना, नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भास्कर जाधव यांचा उल्लेख भटका कुत्रा म्हणून केला. त्यावर आाता वैभव नाईक (Vaibhav Naik) आक्रमक झाले आहेत.

 

ज्याप्रकारे नारायण राणे (Narayan Rane) यांना शिवसैनिकांनी धडा शिकवला होता, तसाच धडा नितेश राणेला शिकवण्याची वेळ आता आली आहे. त्यांना देखील आम्ही शिवसेनेच्या भाषेत धडा शिकवणार आहोत. नितेश राणे काय बोलतात हे त्यांचे त्यांना कळत नाही. मी व्यावसायिक आहे. मी राजकारणात येण्यापूर्वीपासून व्यावसायिक आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षात माझ्या संपत्तीत वाढ झाली आहे. माझ्याजवळ सर्व पेपर असून, मी ते विभागासमोर सादर करणार आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यावर आणि एका पक्षाच्या प्रमुखावर ज्याप्रकारे नितेश राणे टीका करत आहेत, त्यावर महाराष्ट्र सरकार कारवाई करणार आहे का?, असा प्रश्न वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी विचारला.

 

तसेच नितेश राणे यांच्या वक्तव्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार (FIR) दाखल करणार आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हे योग्य वाटते का?,
असे देखील नाईक यावेळी म्हणाले.

नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देताना, भटते कुत्रे आमच्यावर भुंकून गेले, असे म्हंटले होते.
तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात हिंमत नाही, त्यामुळे त्यांनी असे भटके कुत्रे पाळले आहेत.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)
यांच्याकडे बघून निवडणूक आयोगाने त्यांना आईस्क्रिम निशाणी दिली आहे, असेही राणेंनी म्हंटले होते.