शेतकरी आंदोलन : सेलिब्रिटींच्या ट्विटर वॉरमुळे राज ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले- रिहाना ? कोण बाई आहे ती ? आणि सरकार तिला उत्तर का देतंय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन सुरू असलेल्या ट्विटर वॉरमुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केेला आहे. कोण कुठली रिहाना ? कोण बाई आहे ती ? तिला का इतक महत्व दिले जातंय ? तिनं ट्विट करायच्याआधी तिला कुणी ओळखत तरी होत का? आणि अशा व्यक्तीने ट्विट केल्यानंतर आपल्या देशातील भारतरत्नांना सरकारन ट्विट करायला लावणे हे बरोबर नाही, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे

गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळ शेतकरी दिल्लीच्या सीमेवर थंडी- वा-यात आंदोलन करत आहेत. आणखी किती दिवस हे प्रकरण चिघळवणार. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी शेतकऱ्यांसोबत एकत्र बसून हा प्रश्न मार्गी लावावा, असे ठाकरे म्हणाले. तसेच कृषी कायद्यांना होणारा विरोध पाहून सत्ताधारी भाजपने आंदोलन करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही सत्तेत आहात. दिल्लीत बसून तुम्हीच निर्णय घेत आहात मग तुम्हीच आंदोलन का करताय?, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. कृषी कायदे फायद्याचे आहेत. पण ते फक्त एक-दोघांसाठी फायदेशीर ठरू नयेत इतकेच लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कृषी मंत्री आणि आंदोलकांमध्ये चर्चेने तोडगा निघत नसेल. मग पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना एक फोन करुन विषय मिटवून टाकावा, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली होती. पण राज यांनी याबाबत अद्यात कोणताही अधिकृत निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मी फक्त अयोध्येला जायची इच्छा व्यक्त केली. अद्याप कोणताही दौरा निश्चित झाला नसल्याचे ते म्हणाले.

निवडणूकीच्या तोंडावरच नामांतराचा विषय कसा निघतो ?
केंद्र आणि राज्यात जेव्हा शिवसेना-भाजपचं सरकार होते. त्यावेळी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण का झालं नाही? आता निवडणुकीच्या तोंडावरच हे नामांतराचे विषय कसे निघतात? लोकांना काय मुर्ख समजलात का? असा रोखठोक सवाल करत राज यांनी औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला.