MNS Chief Raj Thackeray | ‘100 वर्ष जुनी परंपरा मोडू नका…’, त्र्यंबकेश्वर प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नोट बंदी (2000 Note Ban), त्र्यंबकेश्वर प्रकरणावर (Trimbakeshwar Case) भाष्य केलं. त्र्यंबकेश्वर मुद्यावर बोलताना राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) म्हणाले, शंभर वर्ष जुनी परंपरा (Tradition) मोडीत काढून नका, त्र्यंबकेश्वरमधील प्रथा थांबवणे योग्य नाही. तसेच बाहेरच्यांनी यात पडायचं काय कारण नाही. गावच्या लोकांनी हा निर्णय घ्यायचा आहे. या माध्यमातून कुणाला दंगली हव्या आहेत का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील, तिकडे प्रहार करणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी यावेळी बोलताना त्र्यंबकेश्वरच्या घटनेचा निषेध करत स्थानिक गावकऱ्यांनी याबाबत निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. जर संदलची प्रथा शंभर वर्ष जुनी असेल तर ती मोडीत काढू नये, किंवा बंद करु नये, शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्यात यावा. महत्वाचे म्हणजे गावचा विषय असल्याने इतरांनी यात पडायचं काही काम नसल्याचा सूचक इशारा राज ठाकरेंनी दिला.

याला सोशल मीडिया कारणीभूत

त्र्यंबकेश्वराची प्रथा जुनी आहे, असं समजते. धूप दाखवण्याची परंपरा आहे, त्यांनी धूप दाखवण्याचा प्रयत्न केला. मग एवढा गदारोळ कसा झाला? आपला धर्म एवढा कमकुवत आहे का कोणी आल्याने काही परक पडतो. या माध्यमातून कोणाला दंगली हव्या आहेत का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. या सर्व गोष्टींना सोशल मीडिया कारणीभूत असून त्यावर या गोष्टी पाहिल्या जातात. त्यातून गैरसमज पसरवले जातात. महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) 48 तास द्या, दंगलीच्या घटना घडणार नाहीत, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

नोटबंदीसारखा निर्णय देशाला परवडणारा नाही

राज ठाकरे पुढे म्हणाले, आता लोकांनी परत बँकेमध्ये पैसे टाकायचे, परत तुम्ही नवीन नोटा आणणार असं
सरकार चालतं का? असे प्रयोग होतात का? अशा शब्दात राज ठाकरेंनी मोदी सरकारला सुनावले.
त्यावेळी जेव्हा नोटा आणल्या होत्या तेव्हा एटीएममध्ये जात नव्हत्या. म्हणजे नोटा एटीएममध्ये जात आहेत
की नाहीत हे देखील पाहिलं नव्हतं. नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात, असं परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

Web Title : Pune LokSabha Bypoll Election | Pune Lok Sabha by-election is expected to be held within ‘this’ date, know in detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘राष्ट्रवादीचे आमदार भाजपात येण्यास तयार, पण…’, भाजपच्या बड्या नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

Pune Crime News | विश्रामबाग पोलिस स्टेशन : पतीनेच सासू आणि त्यांच्या मित्राचे फोटो मार्फ करुन बनवले नग्न फोटो, नातेवाईकांना पाठवून केला विनयभंग

Pune LokSabha Bypoll Election | पुणे लोकसभेची पोटनिवडणूक ‘या’ तारखेच्या आत होणे अपेक्षित, जाणून घ्या सविस्तर