MNS Chief Raj Thackeray | 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, औरंगाबादच्या सभेत ‘राज’गर्जना (व्हिडिओ)

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची आज (1 मे) औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा झाली. या सभेची गेल्या 10 दिवसांपासून जोरदार तयारी सुरु होती. या सभेकडे राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिले होते. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर (Marathwada Sanskritik Mandal Ground) पार पडलेल्या सभेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) म्हणाले की, लाऊडस्पीकर मशिदींवर (Azaan On Loudspeakers) लावून तुम्ही गोंगाट करणार असाल, तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करू, मोठ्याने वाचू.

 

मला दंगली घडवायच्या नाहीत
मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) पुढे म्हणाले, मला कुठेही महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. तशी माझी इच्छा देखील नाही. मुस्लिम समाजाने (Muslim Community) देखील ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. ते म्हणाले, त्या दिवशी माझ्याकडे नाशिकला असताना एक पत्रकार आले, ते मुस्लिम समाजातील होते. ते माझ्या कॅबिनमध्ये आले, ते म्हणाले साहेब मी मुसलमान आहे. मात्र, आम्हाला भोंग्याचा खूप त्रास होतो. माझा लहान मुलगा लाऊडस्पीकर लागलं की झोपत नाही. तो आजारी पडायला लागला आहे. आणि दरवेळी तो झोपायला आला की, इकडं आझान सुरु होतं. त्यामुळे माझं मुलं झोपू शकत नव्हतं. त्यानंतर मी त्या मशिदीत जाऊन मौलवींना म्हणालो, तुमच्या भोंग्यामुळे माझ्या मुलाला झोप येत नाही. त्यानंतर त्यांनी आवाज कमी केला.

 

 

तर धर्मानेच उत्तर देऊ
राज ठाकरे म्हणाले, लाउडस्पीकर हा सामाजिक (Social) विषय आहे, हा धार्मिक (Religious) नाही. जर तुम्ही या विषयाला धार्मिक वळण देणार असाल तर त्याच उत्तर धर्मानेच देऊ. आमची इच्छा नसताना आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. महाराष्ट्रामधील शांतता आम्हाला भंग करायची नाही. तशी आमची इच्छा ही नाही.

पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी
शरद पवारांना (Sharad Pawar) हिंदू शब्दांचीच अ‍ॅलर्जी आहे, असे म्हणत महाराष्ट्रात शरद पवारांवर जातीय तेढ निर्माण केल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. आता पवार हे शिवाजी महाराजांबद्दल (Shivaji Maharaj) बोलत आहेत. आठरा पगड जाती महाराष्ट्रासाठी झटत होत्या. पण, आज महाराष्ट्र जातीत सडतोय, असे म्हणत राष्ट्रवादीनेच (NCP) जातीवाद पेरल्याचा घणाघात त्यांनी केला.

 

4 तारखेनंतर ऐकणार नाही
लाऊडस्पीकर हा नवीन विषय नाही, तो धार्मिकही विषय नाही. तो सामाजिक विषय आहे. आता 3 तारखेला त्यांचा सण आहे,
त्यांच्या सणात मला विघ्न आणायचं नाही. पण 4 तारखेनंतर मी ऐकणार नाही. माझी तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे की,
4 तारखेनंतर मंदिरांसमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावा, हवं तर पोलिसांची परवानगी घ्या.
पण, जर भोंगे उतरले नाहीत, तर हनुमान चालिसा लावा, असे म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा हुनुमान चालिसा आणि भोंग्याचा मुद्दा काढला.

 

मात्र ते पवारांना झोंबलं
मी आज शरद पवार यांच्यासाठी काही संदर्भ आणलेत, असंही राज ठाकरे यांनी म्हटले.
शरद पवार हे स्वत: नास्तिक आहेत, तेच मी सभेत सांगितलं. मात्र पवारांना ते झोंबलं, लागलं.
त्यानंतर लगेच पवाराचे मंदिरातील फोटो येऊ लागले. मात्र, पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule)
यांनी स्वत: लोकसभेत सांगितलं होतं की माझे वडील नास्तिक आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | if the loudspeaker is not removed on the 3rd may we will not hear from the 4th may raj thackeray warns government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | ‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही’; फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल 

 

Liver | ‘या’ सवयींमुळे होत यकृत निकामी, जीवनशैलीत बदल करा नाहीतर आजारी पडाल

 

Pune Crime | पुणे शहरात रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या बोटॅनिका, मॅश, रुफ टॉप व्हिलेज, सुफीज, जश्न आणि सायक्लॉन वर कारवाई ! हुक्का पार्लरवर कारवाई; बड्या हॉटेल्सच्या मालकासह 7 जणांवर FIR