MNS Chief RAj Thackeray | महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे अर्धा पक्ष सत्तेत अन् अर्धा विरोधात, मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उडवली खिल्ली (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात जो पक्ष सत्तेत आहे तोच पक्ष विरोधात आहे, अशी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती सध्या राज्यात असल्याची टीका मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief RAj Thackeray) यांनी केली आहे. अशी स्थिती जगाच्या पाठीवर केवळ महाराष्ट्रात असल्याचे राज ठाकरे (MNS Chief RAj Thackeray) म्हणाले. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या शिबिरात राज ठाकरे बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीची (NCP) खिल्ली उडवली.

पुढील वर्षी मुंबईत आणि कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसंदर्भात आज बैठक झाली. भारत काय इंडिया काय किंवा हिंदुस्तान काय… एकमेव देश आहे की जिथे अशाप्रकारची लोकशाही आहे. महाराष्ट्रात घाणेरडी परिस्थिती आहे. अर्धा पक्ष सत्तेत अर्धा पक्ष विरोधात आहे. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे सत्तेत आणि विरोधात एकच पक्ष आहे. सत्तेतही शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि विरोधातही शिवसेना आणि राष्ट्रवादी, असे राज ठाकरे (MNS Chief RAj Thackeray) म्हणाले.

कोकणातला ब्रिज पडला, पण कोणाचं लक्ष नाही

मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) चिपळून नजीकच्या बहादुर शेख नाक्याजवळ नव्याने सुरू
असलेला उड्डाणपुलाचा गर्डर कोसळला. राज ठाकरे म्हणाले. कोकणात ब्रिज पडला, कोणाचंही लक्ष नाही.
सगळ्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करा. मतदानाच्या दिवशी जिवंत राहा झालं की तिकडेच मरा अशी परिस्थिती आहे.
किशोर रुपचंदानी याला 140 कोटी रुपयाचा फ्लायओव्हर बांधायला दिला आणि तो पडला.
चव्हाण म्हणाले एक लेन सुरु करतो, मात्र सगळं फुकट गेलं. लोकांचे जीव जात आहेत मात्र सर्व सुरु आहे.
मुंबईतील 980 कोटी रुपयांचं काम त्यालाच दिलं आहे. हजार दोन हजार कोटींची कामं ब्रिज पडलेल्या लोकांना दिली.
कायदा नावाची गोष्टच उरलेली नाही, भीती राहिलेली नाही. कडक शासन होणार याची भीती उरलेली नाही.
या सर्वांना एखाद दिवशी चटके बसतील, असे राज ठाकरे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धक्कादायक! पुणे पोलिसांनी अटक केलेला घुसखोर बांगलादेशी निघाला बॉम्ब स्फोटातील आरोपी, पुणे पोलिसांची कोर्टात माहिती

Drug Mafia Lalit Patil | पुणे पोलिसांकडून माझ्या जीवाला धोका, ललित पाटीलचा कोर्टात दावा; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी