‘महाविकास’बाबात मनसेकडून पहिल्यांदाच ‘कमेंट’, पुढील निवडणुकीबाबत प्लॅन ठरला ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सत्तास्थापनेनंतर मनसे सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे सर्व सरचिटणीस,उपाध्यक्ष उपस्थित होते. सध्याची राजकीय परिस्थिती आणि पुढील वाटचालीवर या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

बैठकीविषयी माहिती देताना बाळा नांदगावकर म्हणाले की , ‘महाविकास आघाडीबाबत आम्ही तटस्थ भूमिकेतून पाहत आहोत. विचारधारा सोडून दुसरीकडे वळतोय हे लोकांना न पटणारं आहे. जे काही झालं ते लोकांना फारसं पटणारं नाही, महाविकास आघडीबाबात भविष्यात काय भूमिका घ्यायची, हे राज ठाकरे सविस्तरपणे विचार मांडतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आढावा घेतला. लोकांनी मनसेला अनेक ठिकाणी भरभरुन मतदान केले आहे. त्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणूनच पुढील निर्णय घेणार आहोत.’

राज्यात बेरोजगारी, शेतकऱ्यांचे समस्या अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी लवकरच मनसेचं महाधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. हे अधिवेशन कुठे घ्यायचं याबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

यंदाच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबळ आणि सक्षम विरोधी पक्षासाठी पक्षाला मतदान करावं असं आवाहन केलं होतं. मात्र युती आणि आघाडीच्या तुलनेत स्बबळावर लढणाऱ्या मनसेला राज्यात केवळ 1 जागा जिंकता आली. सत्तास्थापनेच्या नाटकात मनसे कुठेच दिसली नाही. सरकारच्या बहुमत चाचणीवेळीही मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.

फेसबुक पेज लाईक करा 👉: https://www.facebook.com/policenama/