MNS On Modi Govt | ”हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं पण, आज…?” मोदी सरकारला मनसे टोला

मुंबई : MNS On Modi Govt | सत्ताधीश कुणीही असो पण आजमितीला किंचितही विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही. पण, ही अटलवाणी ऐकलीत तर कळेल की, हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं पण, आज…? असा प्रश्न विचारत मनसेनं एकीकडे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Former Prime Minister Atal Bihari Vajpayee) यांना ९९ व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे तर दुसरीकडे मोदी सरकारला (MNS On Modi Govt) टोला लगावला.

मनसेने अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यासाठी एक्स हँडलवर एक पोस्ट केली असून यासोबत अटलजींच्या भाषणाचा एक व्हिडिओ जोडला आहे.

मनसेने पोस्ट केलेल्या व्हिडिओत अटलजी म्हणत आहेत की, सरकार येईल, आणि जाईल. पक्ष बनतील आणि बिघडतील, पण हा देश राहिला पाहिजे, या देशातील लोकशाही राहिली पाहिजे.

तत्कालीन पी. व्ही. नरसिंग राव सरकारमध्ये विरोधी पक्षातील नेते असतानाही अटबिहारी वाजपेयी यांना भारताचे
प्रतिनिधी म्हणून जेनिव्हा येथे पाठवण्यात आले होते. त्यावेळी, पाकिस्तानी आश्चर्यचकीत झाले होते, अशी आठवण वाजपेयी यांनी सांगितली होती, हे सांगतानाच त्यांनी देशात सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा दुवा कायम राहिला पाहिजे, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन मनसेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (MNS On Modi Govt)

मनसेने लिहिले आहे की, राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ विरोधात असतानाही सत्तेच्या मोहापायी संयम न
सोडणाऱ्या अटलजींच्या जयंतीला इतकीच प्रार्थना की पुन्हा ह्या देशात विचारांचं, विवेकाचं, तात्विक विरोधाचं
राजकारण रुजो, लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट होवो.

दरम्यान, सोशल मीडियावर देखील अनेकांनी अटलजींना अभिवादन करताना भाजपाला चिमटे काढल्याचे दिसून येत आहे.
तसेच काहींनी अटलजींची वाक्तव्य, कविता शेअर करून आंदरांजली वाहिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | ”टप्प्याटप्प्याने अजित पवारांची ताकद कमी करण्याचा भाजपाचा प्रयत्न, आता…”, रोहित पवारांचे वक्तव्य

Sharad Pawar | शरद पवारांनी परखड शब्दात अजित पवारांना सुनावले, ”माझे बंड यांच्यासारखे…”

Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रियकराचा लग्नास नकार, प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या; तळेगाव दाभाडे येथील घटना

Ashish Shelar | आशिष शेलारांचा शिवसेनेवर पलटवार, ”गांजा, चिलीम ओढून अग्रलेख लिहिणारे, भोंदूगिरी करून…”