MNS | गेली 20 वर्षे महाराष्ट्र राष्ट्रवादीचे संकुचित राजकारण पाहतोय; मनसेचा पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीच्या (NCP) जन्मानंतर राज्यात जातीचा मुद्दा मोठा झाला असे एका मुलाखतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले होते. त्यावरून काही दिवसापासून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर आता मनसेनेही पलटवार केला आहे. मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करून राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा टोला लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीचा मुद्दा (caste issue) मोठा झाला आहे. सध्या तर जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झाला आहे. महाराष्ट्राने देशाला विचार दिला आहे. त्याला जाती-पातींमध्ये खितपत ठेवायचे का आपण? पूर्वी फक्त आपण कुणापैकी असे विचारले जायचे मात्र आता हे लोन शाळेपर्यंत पोहोचले आहे, असे राज यांनी म्हंटले होते.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, पवार म्हणाले की, राज ठाकरेंच्या विधानावर मला काही बोलायचे नाही पण राज यांना माझा सल्ला आहे की, प्रबोधनकारांचे लिखाण वाचा, प्रबोधनकारांचे लिखाण नक्कीच त्यांना योग्य रस्ता दाखवेल, अशी मला खात्री आहे. त्यानंतर शरद पवार काहीही बोलले नाही. मात्र आता मनसेने पलटवार केला आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.
महाराष्ट्र गेले वीस वर्षे पुरोगामी महाराष्ट्र (Progressive Maharashtra) म्हणायचं आणि संकुचित राजकारण (Politics) करायचं हे बघत आहे.
तसेच राष्ट्रवादीने जे केले ते राज ठाकरे बोलले आहेत, यात चुकीचे काही नाही.
जे कोणी आता राज ठाकरे यांच्या भूमिकेवर बोलत आहेत त्यांना योग्य उत्तर दिले जाईल,
असा अप्रत्यक्ष इशारा प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad) यांना दिला आहे.

Web Title :- mns sandeep deshpande replied ncp over caste politics state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi Temple Pune | पुण्यातील ‘मोदीभक्ता’नं उभारलं PM नरेंद्र मोदी यांचं मंदिर (व्हिडीओ)

Governor Bhagat Singh Koshyari | शरद पवारांच्या टीकेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

Shrimant Kokate | ‘पुणे कोणाच्या बापाचं नाय’ हे मनसेनं लक्षात ठेवावं’