MNS-Shinde Group Alliance | मनसे-शिंदे गट युतीच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढला चिमटा, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यानंतर राज ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी मनसे-शिंदे गट युतीचे (MNS-Shinde Group Alliance) वृत्त प्रसारमाध्यमांमधून प्रसारीत झाले. मनसे-शिंदे गटाकडून युतीबाबत (MNS-Shinde Group Alliance) अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. मात्र, दोन्ही बाजूने थेट नकार देखील कुणी दिलेला नाही. आता याबाबत भाजपकडून (BJP) प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मनसे-शिंदे गट युतीबाबत (MNS-Shinde Group Alliance) प्रश्न विचाराला. यावर फडणवीस म्हणाले, तुमची पतंगबाजी मी पाहतो तेव्हा मलाही खूप मज्जा येते. ज्याला जे मनात येईल ते दाखवतो. ज्याला जे विश्लेषण करायचं तो ते करतो. भाजप आणि खरी शिवसेना (Shivsena) जी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे आम्ही एकत्रित निवडणूक लढवू आणि आम्ही मुंबई महापालिकेवर (BMC) भगवा फडकवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

फडणवीस पुढे म्हणाले, कोणतीही निवडणूक (Election) लढत असताना आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे असं समजून तुम्ही झोकून देता त्यावेळेस ती निवडणूक जिंकता येते. हे केवळ मुंबई महानगरपालिकेपुरतं नाही तर ते एकूणच निवडणुकीच्या रणनीती बद्दल होते. भाजप मिशन भारत आहे, महाराष्ट्र भाजपचं (Maharashtra BJP) मिशन महाराष्ट्र आहे.
बारामती महाराष्ट्रातच येते त्यामुळे बारामती मिशन महाराष्ट्रामध्ये आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) विचारांना अभिप्रेत असणारी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे.
शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे भाकीत बाळासाहेब ठाकरेंनी केले होते.
हे जर सत्यात उतरत असेल तर वाईट वाटण्याचं कारण नाही. मात्र, यावर आत्ताच सांगणं कठीण होईल.
मन जुळत असतील. हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावर एकत्र येत असतील ते हे नैसर्गिक आहे,
असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर (Spokesperson Kiran Pavaskar) यांनी मनसे-शिंदे गट संकेत दिले आहेत.

 

Web Title :- MNS-Shinde Group Alliance | bjps leader and deputy cm devendra fadnavis reaction to mns shinde group alliance over bmc election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS-Shinde Group Alliance | हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र येत असतील तर हे नैसर्गिक आहे, शिंद गटाच्या प्रवक्त्यांचे मनसे-शिंदे गट युतीचे संकेत

 

Varsha Usgaonkar | …तर वर्षा उसगांवकरांना सडके मासे खाऊ घालू

 

Cyrus Mistry | डेटा रेकॉर्डर चिप उघड करणार कार दुर्घटनेचे रहस्य? जर्मनीत मर्सिडीज करणार डिकोड