‘मॉब लिचिंग’ ही भारताची परंपरा नाही, हिंदूंना बदनाम करण्याचे ‘षडयंत्र’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – समाजातील एका गटाकडून दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीविरोधात सामुहिक हिंसा करण्याच्या घटना होत आहेत. या घटना एकतर्फी होत नाहीत. काही घटना जाणून बुजून होतात. तर काहींना अवास्तव स्वरुप देण्यात येते. कायद्याचे उल्लंघन करुन होणाऱ्या या घटना परस्पर संबंधांना नष्ट करीत आहेत. या असल्या प्रवृत्ती ही आपल्या देशाची परंपरा नाही व संविधानातही ती बसत नाही. अशा प्रवृत्तींचे संघाने कधीही समर्थन केलेले नाही व या विरोधात आम्ही उभे आहोत.

एखाद्या घटनेला मॉब लिंचिग सारखी उपमा देऊन संपूर्ण देश व हिंदु समाजाला बदनाम करण्याचा देखील प्रयत्न होते. हे एकप्रकारचे षडयंत्रच आहे. याविरोधात कायद्याचे पालन झालेच पाहिजे, असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. विजयादशमीनिमित्त सरसंघचालकांनी उपस्थितींना संबोधित करताना देशासमोरील अनेक प्रश्नांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका स्पष्ट केली.

डॉ. भागवत म्हणाले, ज्यांच्यापर्यंत संघ पोहोचलेला नाही. त्यांच्या मनात विविध लोक व माध्यमांतून भिती उत्पन्न करण्याचे काम होत आहे. आपले दुष्कर्म लपविण्यासाठी आता तर इम्रानखानदेखील संघविरोधात बोलतो आहे. संघ हिंदू समाजाचे संघटन करतो, याचा अर्थ संघ मुस्लिम व खिश्चन विरोधी आहे, असा होत नाही. भारतीय पूर्वजांचे वंशज असलेले व सर्व विविधतांचा स्वीकार करुन एकोप्याने राहणारे सर्वच भारतीय हिंदू आहेत, असे त्यांनी सांगितले.

सरसंघचालकांचे मत
* मातृशक्ती देशात सुरक्षित नाही ही शरमेची बाब असून त्यांना सक्षम केले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी घरातून सुरुवात करावी.

* देशातील नागरिकांना गुलाम करणारी ही शिक्षण व्यवस्था आहे. भारतीय दृष्टी डोळ्यासमोर ठेवून शिक्षण प्रणाली तयार करावी लागेल. स्वभाषा, स्वभूषा, स्वसंस्कृती, कालसंगत, सत्यनिष्ठा, कर्तव्यबोध यावर आधारित शिक्षण प्रणाली हवी.

*जीडीपीचे मानक दोषपूर्ण
* आर्थिक मंदीतून निश्चित बाहेर पडू, जगातील अर्थव्यवस्थेत आलेली मंदी व अमेरिका -चीनमध्ये सुरु असलेल्या आर्थिक स्पर्धेचा फटका भारताला बसला आहे. या मंदीच्या चक्रातून देश निश्चित बाहेर येईल. जगातील प्रचलित मानक अनेक आर्थिक प्रश्नांचा उलगडा करत नाहीत. त्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला देशाच्या मुळांमध्ये जावे लागेल.

Visit  :Policenama.com