खुशखबर ! ‘लावा’चा फक्त 999 रूपयांचा नवीन फोन लॉन्च, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही जर स्वस्तातला एखादा नवा फोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी लावा कंपनीने एक नवा फोन लॉन्च केला आहे. Lava A1 Colors असे या नव्या लावा फोनचे नाव आहे. कंपनीचा हा खास एडिशन फिचर फोन आहे. विशेष म्हणजे हा फोन तुमच्या खिशाला देखील परवडणारा आहे कारण या फोनची किंमत केवळ ९९९ रुपये इतकी आहे.

अशी आहेत वैशिष्ट्ये

–हा फोन लाइट ब्लू, ग्रीन आणि मॅझेंटा रेड या तीन रंगात उपलब्ध आहे.
–लावाचा हा फोन पॉलिकॉर्बोनेट बॉडीसह आहे.
–या फोनमध्ये १.८ इंचाचा टीएफटी डिस्प्ले दिला आहे.
–या फोनचा स्क्रीन रिझॉल्यूशन १२८x१६० पिक्सल आहे
–लावाच्या या फोनमध्ये ८०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर या फोनची बॅटरी तीन दिवस राहत असल्याचा कंपनीचा
दावा आहे.
–फोनमध्ये ०.३ मेगापिक्सलचा बॅकला कॅमेरा दिला आहे.

लावाचा हा फोन इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, पंजाबी आणि गुजराती या सात भाषेत सपोर्ट करणार आहे. या फोनमध्ये कॉन्टॅक्ट फोटोज, आयकॉन सपोर्ट, इंस्टंट टॉर्च आणि ऑटो कॉल रिकॉर्डिंग करण्याची सुविधा आहे. फोनच्या टॉर्चमध्ये सेंटर नेव्हिगेशन बटन क्लिक केल्यानंतर तत्काळ सुरू होते. या फोनमध्ये कॅलक्युलेटर, स्टॉपवॉच, कॅलेंडर आणि अलार्म यासारखे फीचर देण्यात आले आहेत.