Mi ची भन्नाट ‘ऑफर’ ! शाओमीच्या स्मार्टफोनवर तब्बल 4 हजार पर्यंतची ‘सूट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करत असाल तर आपल्यासाठी शाओमी (Xiaomi) एक चांगली संधी घेऊन येत आहे. कारण शाओमी आता आपल्या स्मार्टफोनवर डिस्काउंट देत आहे. mi.com वर एमआय सुपर सेल (Mi Super Sale) सुरू होत असून या सेलमध्ये शाओमी आपल्या स्मार्टफोनवर तब्बल ४ हजारांपर्यंत डिस्काउंट देत आहे. ही सूट Redmi Note 8 Pro, Redmi Note 7 Pro आणि Redmi K20 सीरिजच्या फोनवर नो-कॉस्ट EMI चा पर्याय दिला जात आहे. ICICI क्रेडिट कार्डवरच्या ईएमआयवर ५ टक्के तात्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे. Mi.com ने आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शन वर ५ टक्के तात्काळ डिस्काउंट देण्यासाठी कंपनीने ICICI बँकेसोबत करार केला आहे.

या सेलमध्ये Redmi Note 8 Pro ची किंमत कमी करण्यात आलेली नाही परंतु एक्सचेंजवर या स्मार्टफोन वर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनवर १ हजार रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे. तसेच Redmi Note 7 Pro चा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचा स्मार्टफोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये करण्यात आली आहे. म्हणजे या स्मार्टफोनवर तब्बल ४००० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. Redmi Note 7 Pro चा ६ जीबी रॅम असलेला आणि ६४ जीबी स्टोरेजचा फोन १० हजार ९९९ रुपयात, तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकणार आहे. तसेच या सेलमध्ये Redmi K20 ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन १९ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे.

Redmi K20 या स्मार्टफोनवर जवळपास २ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर रेडमी के२० ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोन २२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. आणि विशेष म्हणजे एक्सचेंजवर २ हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळणार आहे. Redmi K20 Pro चा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनवर जवळपास ३ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. आता हा फोन २४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.