Jio ला मागे टाकत BSNL नं मारली बाजी, बनवलं नवीन ‘रेकॉर्ड’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मागील वर्षी डिसेंबर २०१९ मध्ये प्रीपेड प्लानमध्ये टॅरिफचे दर वाढवण्यात आले होते. याचा मोठ्या प्रमाणात फायदा भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच सरकारी कंपनी BSNL ला झाला. डिसेंबर २०१९ मध्ये संपूर्ण देशभरातून बीएसएनएलने सर्वात जास्त प्रमाणात नवीन युजर्स जोडले आहेत. या तुलनेत इतर टेलिकॉम कंपन्या खूप मागे आहेत. BSNL प्रथम क्रमांकावर असून रिलायन्स जिओ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये बीएसएनएलने जवळपास ४.२ लाख इतके नवीन युजर्स जोडले आहेत. तर रिलायन्स जिओने केवळ ८२ हजार ३०८ नवीन युजर्स जोडले आहेत. युजर्सने BSNL व जिओच्या तुलनेत व्होडाफोन-आयडिया कडे नेहमीप्रमाणेच पाठ फिरवली आहे. यापाठोपाठ भारती एअरटेल आणि एमटीएनएलने देखील आपले युजर्स गमावले आहेत. रिलायन्स जिओच्या बाबतीत खास बाब म्हणजे २०१६ मध्ये टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण करणारी रिलायन्स जीओने प्रत्येक महिन्यात पाच मिलियनपेक्षा अधिक युजर्स जोडण्याचे काम केले आहे. पण, डिसेंबर महिन्यात टॅरिफचे दर वाढवल्यानंतर पहिल्यांदा जिओने आपले युजर्स गमावले आहेत. मागील वर्षांच्या डिसेंबर महिन्यात जीओला फक्त ८२ हजार ३०८ नवीन युजर्स जोडता आले आहेत.

डिसेंबर २०१९ मध्ये बीएसएनएलने सर्वात जास्त म्हणजे ४२७०८९ इतके नवीन युजर्स जोडले आहेत. विशेष म्हणजे BSNL ला पहिल्यांदाच जिओला मागे टाकण्यात यश मिळाले आहे. बीएसएनएलचे मार्केट शेअर १०.२६ टक्के आहे. डिसेंबर महिन्यात टेलिकॉम खासगी कंपन्यांनी आपल्या प्रीपेड टॅरिफच्या दरात ४० टक्के दरवाढ केली आहे. त्यामुळे BSNL ला नवीन युजर्स जोडण्यात मदत मिळाली आहे. तर डिसेंबर मध्ये व्होडाफोन-आयडियाच्या ३.६ मिलियन युजर्संनी सेवा सोडली. तर डिसेंबरमध्ये एअरटेलने आपले ११ हजार ग्राहक गमावले आहेत.

You might also like