पुण्यातील भीषण आगीच्या घटनेबद्दल PM मोदींकडून शोक व्यक्त, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुण्याच्या (pune) मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागून 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि. 7) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. यात प्रामुख्याने महिला कामगारांचा समावेश आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ( Prime Minister Narendra Modi) ट्विट करुन या दु:ख व्यक्त केले आहे. पुण्यातील (pune) कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहाणीमुळे अंतकरणाला वेदना होत असल्याचे मोदीनी म्हटले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, मृतांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

आगीची माहिती मिळताच पुणे (pune) पालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमक दलाच्या गाड्या तातडीने रवाना झाल्या.
मात्र सॅनिटायझर बनविले जात असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले होते.
घटनास्थळी आक्रोश अन् किंकाळ्या ऐकू येत होत्या.
जेसीबीच्या सहाय्याने भिंत फोडून कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले.
प्राथमिक माहितीनुसार 37 पैकी 10 कामगारांना बाहेर काढले.
मात्र 20 कामगार अडकले होते. सायंकाळी उशिरापर्यंत 20 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली.

राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत
मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळी रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे.
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

चौकशीचे आदेश
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे.
मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करुन चौकशीचे आदेश दिले आहेत.
त्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल.
पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे. सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणे आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात आल्याचे ते म्हणाले.

Also Read This : 

 

Pune Fire News | पुण्यातील पिरंगुट एमआयडीसीमधील सॅनिटायजर तयार करणार्‍या कंपनीला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू

जेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध क्रिकेटर, मॉडलसह सोबत ‘या’ आवस्थेत दिसला होता पीटरसन

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,219 नवीन रुग्ण, तर 21,081 जणांना डिस्चार्ज