Coronavirus : दिलासादायक ! महाराष्ट्रात ‘प्लाझ्मा’ थेरपीला केंद्राची मंजुरी, ‘या’ शहरात होणार सर्वप्रथम

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाने थैमान घातले असताना आता कोरोना उपचारासंदर्भात एक दिलासादायक बातमी आहे. आता महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या उपचारात या थेरपीमुळे दिल्लीत मोठं यश आलं आहे. दिल्लीत प्लाझ्मा थेरपीची चाचणी घेण्यात आली. प्रारंभिक चाचणीचा निकाल सकारात्मक आला आहे. याच धर्तीवर आता केंद्राने महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी घेण्यास मंजुरी दिली आहे. आहे

मुंबई आणि कोल्हापुरात सर्वप्रथम होणार उपचार

देशात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. या पार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोनमध्ये जलद गतीने चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे प्लाझ्मा थेरपीची परवानगी मागितली होती. आता मुंबई व कोल्हापूरमध्ये प्लाझ्मा थेरपीचा सर्वप्रथम वापर करण्यात येणार आहे. कोल्हापुरात कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. आता त्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आधी कोल्हापूर आणि नंतर पुणे, मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार आहे.

कोल्हापुरातील गंभीर रुग्णावर होणार प्लाझ्मा थेरपी

केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर आता कोल्हापुरात एका गंभीर कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरेपी करण्यात येणार आहे. 18 एप्रिलरोजी पुण्यात पूर्णपणे बरा झालेल्या रुग्णाच्या प्लाझ्माची यात मदत घेण्यात येणार आहे. हा रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या परवानगीने त्याचा 550 मिलीलीटर प्लाझ्मा घेण्यात आला होता. आता हा प्लाझ्मा कोल्हापुरातील कोरोनाबाधित रुग्णाला बरे करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

दरम्यान, देशात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 23 हजार 077 इतकी झाली आहे. तर 4 हजार 749 रुग्ण बरे झाले आहेत. तर 718 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 1हजार 684 नवीन प्रकरणे तर 24 तासांत 37 मृत्यू झाला आहे.

प्लाझ्मा थेरपी मध्ये नक्की काय होते ?

खरं तर, कोवॅलेन्सेन्ट प्लाझ्मा ट्रीटमेंट हे वैद्यकीय शास्त्राचे एक मूलभूत तंत्र आहे. जग ही थेरपी जवळपास 100 वर्षांपासून वापरत आहे. हे बर्‍याच प्रकरणांमध्ये फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे आणि कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये याचा फायदा होत आहे.हे तंत्र देखील विश्वासार्ह आहे. यात जुन्या रुग्णांच्या रक्ताने वैज्ञानिक नवीन रुग्णांवर उपचार करतात. दीर्घ आजारी रूग्णाचे रक्त घेऊन त्यातून प्लाझ्मा काढून टाकला जातो . मग हा प्लाझ्मा दुसर्‍या रुग्णाच्या शरीरात पाठवला जातो.

आता शरीरात काय प्रक्रिया आहे ते समजून घ्या. जुन्या रूग्णाच्या रक्ताच्या आत व्हायरसशी लढा देण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात. या अँटीबॉडीज विषाणूंविरूद्ध लढतात आणि त्यांचा जीव घेतात. किंवा त्यांना दाबून टाकतात. हे अँटीबॉडीज बहुधा रक्तातील प्लाझ्मामध्येच असतात.एखाद्याचा प्लाझमा काढून स्टोअर करता येतो. जेव्हा नवीन रुग्ण येतो तेव्हा त्याला हा प्लाझमा चढवता येतो.