देशातील 9400 ‘शत्रू संपत्ती’ विकून 1 लाख कोटी कमवेल मोदी सरकार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरातील शत्रूंची संपत्ती विकून मोठी वसुली करण्यासाठी मोदी सरकारने तीन समित्यांची नियुक्ती केली आहे. या समितीद्वारे देशाचे शत्रू असलेल्या व्यक्तींच्या संपत्तीला आळा घालवून त्यातून पैसे वसूल केले जाणार आहे. यातून सरकारला एक लाख कोटी रुपयांपर्यंत धन उपलब्ध होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

अमित शहा करणार नेतृत्व
गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात सांगण्यात आले आहे की, यासंबंधी ज्या तीन समिती बनवण्यात आल्या आहेत त्यांचे नेतृत्व अमित शहा यांच्याकडे असेल असे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ज्यांनी चीन किंवा पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे त्यांच्या संपत्तीचा यामध्ये समावेश असणार आहे. यासंबंधी एक टीम नियुक्त करण्यात आली आहे. ज्याचे नेतृत्व गृह सचिव आणि सार्वजनिक संपत्ती विभागाचे अधिकारी करतील तसेच यामध्ये इकॉनोमिक प्रकरणांशी संबंधित अधिकाऱ्यांचा देखील समावेश असेल.

केंद्राद्वारे ज्या तीन समिती बनवण्यात आल्या आहेत त्यामध्ये अमित शहा, निर्मला सीतारामन आणि नितीन गडकरी यांचा देखील समावेश आहे.

युपीमध्ये सर्वात जास्त संपत्ती
देशामध्ये 9280 पाकिस्तानी आणि 126 चिनी नागरिकांची संपत्ती आहे. देशामध्ये एक लाख कोटींपेक्षा अधिक शत्रू संपत्ती आहे तसे यामध्ये चार हजार कोटींपेक्षा अधिक संपत्ती उत्तर प्रदेशात तर 2700 पश्चिम बंगाल आणि 487 कोटींपेक्षा अधिक संपत्ती नवीदिल्ली मध्ये असल्याचे वक्तव्य माजी मंत्री हंसराज अहीर यांनी 2018 मध्ये केले होते.

फेसबुक पेज लाईक करा –