मोदी सरकारचा मोठा निर्णय, १९ मोठ्या सरकारी कंपन्या बंद करण्यास मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने देशातील तोट्यात चालणाऱ्या तब्बल १९ कंपन्या बंद करण्याची मंजूरी दिली आहे, यात  HMT, हिंदुस्तान केबल आणि इंडियन ड्रग्स सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. मंगळवारी लोकसभेत काँग्रेसचे खासदार अदूर प्रकाश यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली. अदूर प्रकाश यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला की, सरकार तोट्यात चालणाऱ्या PSU ला बंद करण्याचा किंवा कंपन्याच्या खासगीकरणाचा विचार करत आहे का ?

१९ सरकारी कंपन्या बंद करण्यास दिली मंजुरी  –

अवजड उद्योग मंत्रालयाचे मंत्री अरविंद गणपत सावंत यांनी विविध विभागात तोट्यात असलेल्या कंपन्यांची माहिती दिली. याच बरोबर त्यांनी १९ PSU कंपन्यांची सूची दिली ज्या कंपन्या बंद करण्याचा विचार आहे. मंत्रालायाने दिलेल्या माहितीनुसार या कंपन्यांमध्ये तुंगभद्रा स्टील प्रोडक्टस लिमिटेड, HMT वॉचेज लिमिटेड, HMT बियरिंग्स लिमिटेड, हिंदुस्तान केबल्स लिमिटेड, HMT लिमिटेड टॅक्टर युनिट आणि इंस्ट्युमेंटेंशन लिमिटेड यासारख्या इतर कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कंपन्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने ज्या कंपन्यांना  विक्री करण्याची मंजुरी दिली आहे त्यात २५पेक्षा अधिक कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यामध्ये सेल, एचपीएल आणि हिंदुस्तान कॉर्पोरेशन लिमिटेड सारख्या कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

 

या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा

‘केस’ धुताना घ्या ही काळजी

मधुमेहामुळे पाय गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी ‘ही’ काळजी अवश्य घ्यातोंडाच्या कॅन्सरपासून

संरक्षण करणारे भारतीय उत्पादन ‘स्वर्णसाथी’